भरल्या ताटावरुन अटलजी उठले अन् लखनौ विमान अपहरणातील 48 भारतीयांचा जीव वाचला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 08:57 AM2018-08-17T08:57:56+5:302018-08-17T09:07:53+5:30

देशात रामजन्मभूमीचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी अटलजी लखनौ येथून खासदार होते. वाजपेयी लखनौला आल्यानंतर नेहमीच मीराबाई रोड येथील विश्राम निवासात राहात होते. एकदा

Atalji got up from the stairs and survived 48 Indians who were abducted in Lucknow | भरल्या ताटावरुन अटलजी उठले अन् लखनौ विमान अपहरणातील 48 भारतीयांचा जीव वाचला

भरल्या ताटावरुन अटलजी उठले अन् लखनौ विमान अपहरणातील 48 भारतीयांचा जीव वाचला

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देश शोक सागरात बुडाला आहे. राजकीय वर्तुळातील नेते आणि सर्वचजण त्यांच्यासोबतच्या आठवणी जागवत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत. तसेच त्यांच्या कार्यकाळातील आठवणीही सांगण्यात येत आहेत. अटलजींचे राजकीय मित्र भाजपा नेते लालजी टंडन यांनी एक किस्सा सांगितला आहे. त्यामध्ये, अटलबिहारी यांनी कशाप्रकारे भरल्या ताटावरुन उठत 48 प्रवाशांचा जीव वाचवला होता, हा प्रसंग टंडन यांनी सांगितला.

Atal Bihari Vajpayee : कार्यकर्ता खाली पेट नही सोया...

देशात रामजन्मभूमीचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी अटलजी लखनौ येथून खासदार होते. वाजपेयी लखनौला आल्यानंतर नेहमीच मीराबाई रोड येथील विश्राम निवासात राहात होते. एकदा प्रवासातील शेवटच्यादिवशी अटलजी रात्री जेवण करत होते. त्यानंतर त्यांना दिल्लीला जायचे होते. त्याचवेळी लखनौचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि राज्यपाल मोतीलाल वोरा यांचे सल्लागार धावतच अटलबिहारी यांच्याकडे आले होते. मात्र, अटलजी जेवण करत होते, त्यामुळे जेवणानंतरच त्यांची भेट होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांना विश्रामगृहातून सांगण्यात आले. मात्र, भेट अत्यंत गरजेची असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दरवाजा उघडून थेट अटलजींच्या खोलीत प्रवेश केला. जिल्हाधिकाऱ्यांना पाहून अटलजी आश्चर्यचकित झाले अन् म्हणाले, बोला साहेब कसं काय येणं केलं ?

Atal Bihari Vajpayee : भाजपा-शिवसेना युतीचे अटलजी होते शिल्पकार 

जिल्हाधिकाऱ्यांनी घाबरलेल्या अवस्थेतच प्रसंग सांगायला सुरुवात केली. अमौसी विमानतळावर एका युवकाने विमानाचे अपहरण केले असून त्याच्या हातात बॉम्ससदृश्य वस्तू आहे. विमान अपहरणकर्त्याने विमान बॉम्बने उडविण्याची धमकी दिली आहे. मात्र, जर अटलबिहारी वाजपेयी आले, तर सर्व प्रवाशांना सोडून देईल असेही या युवकाने सांगितल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले. त्यावेळी, तेथेच उभे असलेल्या लालजी टंडन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न केला. तुम्ही अटलींना तेथे घेऊन जाल, पण तुम्हाला त्यांच्या सुरक्षेची काळजी नाही का ?. जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडून उत्तर येण्यापूर्वीच वाजपेयींनी अर्ध्या ताटावरुन उठत जिल्हाधिकाऱ्यांसोबत जाण्याची तयारी सुरु केली. 

Atal Bihari Vajpayee : अग्रलेख - स्टेटस्मन अटलजी

Atal Bihari Vajpayee : मीडियासाठी एक आदर्श पंतप्रधान

अटलबिहारी वाजयेपी, लालजी टंडन, जिल्हाधिकारी आणि वोरा यांचे सल्लागार हे चारजण त्या युवकाला भेटायला गेले. प्रथम युवकास अटलजींनी विमानतळ टॉवरवरुन विमानात संपर्क केला. मात्र, युवकाने अटलबिहारी यांचा आवाज ओळखत नसून त्यांनी विमानात येऊन भेटण्याची मागणी केली. यावेळीही सोबतच्या सहकाऱ्यांनी अटलजींना विमानात न जाण्याचे सूचवले. मात्र, अटलजींनी कशाचीही तमा न बाळगता, लखनौ विमानतळावर आपली कार नेली. सर्वप्रथम ललजी टंडन यांनी विमानातील तरुणाची भेट घेतली. त्यानंतर, अटलबिहारी वाजपेयीही विमानात जाऊन युवकाला भेटले. दोघांमध्ये काही मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर, लालजी टंडन यांनी तरुणाला अटलजींचे चरण स्पर्श करण्याचे सूचवले. त्यामुळे अपहरणकर्ता युवक अटलींचे पाय पकडण्यासाठी पुढे सरसावला. त्याचवेळेस, पोलिसांनी तरुणाच्या दंडाला कचकाटून पडकले. तरुणाला ताब्यात घेतले. तरुणानेही लगेचच, जवळील बॉम्बसदृश्य वस्तूचे तुकडे-तुकडे करुन ते सुतळीचे असल्याचे सांगितले. तसेच, माझ्याकडे कुठलाही बॉम्ब नसून केवळ रामजन्मभूमीवरुन देशात किती आक्रोश आहे, हेच मला अटलींना दाखवून द्यायचे होते, असे या युवकाने म्हटले होते. दरम्यान, या विमानातून 48 प्रवासी प्रवास करत होते. तर, अटलजींनी विमानातील प्रवाशांचीही भेट घेतली होती.

Web Title: Atalji got up from the stairs and survived 48 Indians who were abducted in Lucknow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.