नवी दिल्ली- माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीमधील एम्स रुग्णालयात आज निधन झाले. अटल बिहारी वाजपेयी 2009 पासून आजारी होते. त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागत होता. वाजपेयी डिमेंशिया म्हणजेच स्मृतीभ्रंश या आजाराने ग्रस्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते कोणत्याही सभेत किंवा भाजपाच्या कार्यक्रमात दिसलेले नव्हते. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्वीटरवर अत्यंत भावपूर्ण शब्दांमध्ये श्रद्धांजली वाहिली आहे.
Atalbihari Vajpayee: मैं नि:शब्द हूं, शून्य में हूं; पंतप्रधानांनी ट्वीटरवरुन वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 18:12 IST