जवळपास दोन दशकांपूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेली भविष्यवाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या विजयाने खरी ठरविली आहे. 1999 मध्ये केवळ 1 मतामुळे अटलबिहारी वाजपेयींचे सरकार पडले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले होते.
लोकसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावावेळी अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारला बहुमतासाठी 1 मत कमी मिळाले होते. यामुळे त्यांना सत्ता सोडावी लागली होती. यावेळी वाजपेयी राजीनामा देत असताना विरोधकांनी त्यांनी खिल्ली उडविली होती. तसेच जोरजोरात बेंच वाजवत होते. यावेळी अटलबिहारी वाजपेयींना विरोधकांना त्यांच्या शैलीत सुनावले होते.
आज तुम्ही आमची उपहासात्मक खिल्ली उडवत आहात, पण एक दिवस असा येईल की लोक तुमची खिल्ली उडवतील, असे त्यांनी विरोधकांना सांगितले होते. वाजपेयींचे हे भाषण अनेक बाबतीत आठवणीत राहिले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या घवघवीत यशामुळे वाजपेयींचे ते भाषण पुन्हा चर्चेत आले आहे.