Atal Bihari Vajpayee's prediction was true after two decades | अखेर दोन दशकांनी अटलबिहारी वाजपेयींची भविष्यवाणी खरी ठरली...
अखेर दोन दशकांनी अटलबिहारी वाजपेयींची भविष्यवाणी खरी ठरली...

जवळपास दोन दशकांपूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेली भविष्यवाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या विजयाने खरी ठरविली आहे. 1999 मध्ये केवळ 1 मतामुळे अटलबिहारी वाजपेयींचे सरकार पडले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले होते. 


लोकसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावावेळी अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारला बहुमतासाठी 1 मत कमी मिळाले होते. यामुळे त्यांना सत्ता सोडावी लागली होती. यावेळी वाजपेयी राजीनामा देत असताना विरोधकांनी त्यांनी खिल्ली उडविली होती. तसेच जोरजोरात बेंच वाजवत होते. यावेळी अटलबिहारी वाजपेयींना विरोधकांना त्यांच्या शैलीत सुनावले होते. 


आज तुम्ही आमची उपहासात्मक खिल्ली उडवत आहात, पण एक दिवस असा येईल की लोक तुमची खिल्ली उडवतील, असे त्यांनी विरोधकांना सांगितले होते. वाजपेयींचे हे भाषण अनेक बाबतीत आठवणीत राहिले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या घवघवीत यशामुळे वाजपेयींचे ते भाषण पुन्हा चर्चेत आले आहे. 


याच भाषणात वाजपेयींनी सपूर्ण देशात कमळ उगवणार असल्याचीही भविष्यवाणी केली होती. या विजयाने त्यांच्या दोन्ही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. मात्र, यासाठी दोन दशकांचा वेळ जावा लागला. 


मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएने 353 जागा जिंकल्या आहेत. तसेच काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदापासून दलग दुसऱ्यांदा वंचित राहावे लागणार आहे. गेल्या वेळी विरोधी पक्षाचा नेत्याचा दर्जा देण्य़ासाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले होते. मात्र, यंदाही काँग्रेसला ते मिळू शकणार नाही. तसेच या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याकडून हरले आहेत. 
 


Web Title: Atal Bihari Vajpayee's prediction was true after two decades
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.