शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Atal Bihari Vajpayee Death: 'अटल' अध्यायाची सांगता; माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 17:54 IST

Atal Bihari Vajpayee: वयाच्या 93 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्लीः बाधाएँ आती है आएँ, घिरे प्रलय की घोर घटाएँ पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएँ निज हाथों में हँसते-हँसते, आग लगाकर जलना होगाकदम मिलाकर चलना होगा...या आपल्या कवितेप्रमाणेच, प्रत्येक संकटाशी न डगमगता लढलेले, सत्तेचा मोह न बाळगता हसत-हसत राजीनामा देण्याचं धारिष्ट्य दाखवलेले आणि एक-दोन नव्हे तर तब्बल 22 पक्षांसोबत 'कदम मिलाकर' सरकार चालवलेले देशाचे माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांचं आज निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यानं देशाच्या राजकीय इतिहासातील 'अटल' अध्यायाची सांगता झाल्याची भावना व्यक्त होतेय. माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयींचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 93व्या वर्षी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अटलबिहारी वाजपेयी यांना 11 जून 2018 रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 66 दिवसांपासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. 

वाजपेयी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. वाजपेयी यांच्या निधनामुळे सर्वांना सोबत घेऊन चालणारा सहिष्णू नेता हरपल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. एम्समध्ये उपचार सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळपास दोनदा अटलबिहारी वाजपेयींची भेट घेऊन डॉक्टरांकडे प्रकृतीची विचारपूस केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे राहुल गांधी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री विजय गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी वाजपेयींची भेट घेतली होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी 2009 पासून आजारी होते. त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागत होता. वाजपेयी डिमेंशिया म्हणजेच स्मृतीभ्रंश या आजाराने ग्रस्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते कोणत्याही सभेत किंवा भाजपाच्या कार्यक्रमात दिसलेले नव्हते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDeathमृत्यूprime ministerपंतप्रधानdelhiदिल्लीBJPभाजपाAIIMS hospitalएम्स रुग्णालय