2 वर्षांपासून सुरू होते प्रेमप्रकरण; प्रियकराचा लग्नाला नकार, अन् प्रेयसीने घरच्यांचं वाढवलं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 17:08 IST2023-01-31T17:08:07+5:302023-01-31T17:08:34+5:30
झारखंडमधील गोड्डा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

2 वर्षांपासून सुरू होते प्रेमप्रकरण; प्रियकराचा लग्नाला नकार, अन् प्रेयसीने घरच्यांचं वाढवलं टेन्शन
नवी दिल्ली : झारखंडमधील गोड्डा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. खरं तर गोड्डा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेयसीने प्रियकराच्या घराबाहेर प्रचंड गोंधळ घातला. प्रेयसीच्या म्हणण्यानुसार, तिचे गोड्डा येथील मुस्तकीम खान याच्यासोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन दिवसांपूर्वी प्रियकराने तिला बांका येथून गोड्डा येथे आणले. येथे तिला जत्रेतही नेण्यात आले. 2 दिवस घरी ठेवल्यानंतर सोमवारी तिला अचानक घराबाहेर हाकलून दिले.
संबंधित मुलीच्या आईने सांगितले की, त्यांना आपल्या मुलीसोबत हा प्रकार घडल्याचे समजले तेव्हा त्या देखील घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, प्रियकर तरुण घटनास्थळावरून फरार झाला होता. तरुणाचे वडील नसीर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी त्यांच्या घरी नव्हती. अचानक ती कुठूनतरी आली आणि घराबाहेर गोंधळ घालू लागली. मुस्तकीम खान कुठे आहे असे विचारले असता त्यांनी सांगितले की, तो कुठे गेला आहे हे घरातील कोणालाच माहीत नाही.
पोलिसांनी केली विचारपूस
या सर्व गोंधळातच या प्रकरणाची माहिती शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मुलीची चौकशी केल्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर मुलगी आणि मुलगा घरी भेटले की नाही याची चौकशी करण्यासाठी प्रियकराच्या भावाची पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली.
प्रियकर अद्याप फरार
नगर पोलीस ठाण्याचे एएसआय सलीम खान यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यात मुलगी आणि मुलाच्या कुटुंबीयांशी बोलणे झाले. आता दोन्ही पक्षांनी लग्नासाठी होकार दिला आहे. पण मुलगा अद्याप घरी परतलेला नाही. मात्र, दोघांचे लग्न होण्याची शक्यता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"