३२ गाड्या, ३७ बँकांत खाती आणि..., आसाममधील ‘या’ महिला नेत्याकडे आहे गडगंज संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 16:08 IST2026-03-25T15:47:10+5:302026-03-25T16:08:01+5:30

Assam Assembly Election 2026: आसाममधील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दरम्यान, उमेदवारी अर्जामधील माहितीमधून आसाममधील एका महिला नेत्याकडे असलेल्या गडगंज संपत्तीची माहिती समोर आली आहे.

Assam Assembly Election 2026: 32 cars, 37 bank accounts and..., 'this' female leader from Assam owns Gadganj property | ३२ गाड्या, ३७ बँकांत खाती आणि..., आसाममधील ‘या’ महिला नेत्याकडे आहे गडगंज संपत्ती

३२ गाड्या, ३७ बँकांत खाती आणि..., आसाममधील ‘या’ महिला नेत्याकडे आहे गडगंज संपत्ती

आसाममधील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दरम्यान, उमेदवारी अर्जामधील माहितीमधून आसाममधील एका महिला नेत्याकडे असलेल्या गडगंज संपत्तीची माहिती समोर आली आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंटच्या उमेदवार असलेल्या सेवली महिलारी यांनी आसाममधील कोकराझार मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जातील शपथपत्रामधून एकूण ५४.०४ कोटी रुपयांच्या मालमत्तेची आकडेवारी दिली आहे. तसेच या शपथपत्रानुसार सेवली महिलारी यांच्याकडे ३७ बँक खाती आणि तब्बल ३२ वाहने आहेत.

उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रानुसार सेवली यांची एकूण ३७ बँक खाती आहेत. या बँक खात्यांमध्ये एकूण ५.२६ कोटी रुपये आहेत. तसेच सेवली यांच्याकडे १६ टिप्पर ट्रक आणि ४ ट्रॅक्टरसह एकूण ३२ वाहने आहेत. त्यांच्याकडील एकूण जंगम मालमत्तेमध्ये १२.५९ कोटी रुपयांची यंत्रसामुग्री आणि २०.०३ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश  आहे. मात्र सेवली यांचे पती हाग्रामा महिलारी यांच्याकडे मात्र ९.१७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर सेवली महिलारी यांच्याकडे १२ कोटी रुपयांहून अधिक किमतीची वाहने आहेत. तर त्यांच्याकडे असलेल्या जंगम मालमत्तेमध्ये शेतजमीन आणि व्यावसायिक इमारतींचा समावेश आहे.

मात्र एवढी संपत्ती असूनही सेवरी ह्या काही आशाममधील सर्वात श्रीमंत उमेदवार नाही आहेत. संपत्तीच्याबाबतीत एआययूडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांच्या तुलनेत त्या खूप मागे आहेत. अत्तराचे व्यापारी असलेल्या अजमल यांच्याकडे एकूण २२२.३४ कोटी रुपये एवढी संपत्ती आहे.  

Web Title : असम की नेता की संपत्ति: 32 वाहन, 37 बैंक खाते उजागर

Web Summary : असम चुनावों में बीपीएफ उम्मीदवार सेवली महिलारी की ₹54.04 करोड़ की संपत्ति का खुलासा। उनके पास ₹5.26 करोड़ के साथ 37 बैंक खाते और ट्रक और ट्रैक्टर सहित 32 वाहन हैं। उनकी चल और अचल संपत्ति करोड़ों की है, हालांकि एआईयूडीएफ के अजमल से कम।

Web Title : Assam Politician's Wealth: 32 Vehicles, 37 Bank Accounts Revealed

Web Summary : Assam elections reveal BPF candidate Sewali Mahilari's ₹54.04 crore assets. She possesses 37 bank accounts with ₹5.26 crore and 32 vehicles, including trucks and tractors. Her movable and immovable assets are worth crores, though less than AIUDF's Ajmal.