शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

काँग्रेस महात्मा गांधींच्या नाही, तर जिनांच्या मार्गावर जातोय; शिवराज सिंह चौहान यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 3:07 PM

Assam Assembly Election 2021 - मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (shivraj singh chauhan) आसाम दौऱ्यावर असून, एका जनसभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आसाम दौऱ्यावरकाँग्रेस गांधींऐवजी जिनांच्या मार्गावर जात असल्याची केली टीकाकाँग्रेस पक्ष केवळ SRP मध्ये अडकून राहिला आहे.

नाहरकटिया : आसाम विधानसभा निवडणुकांचा (Assam Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून, भाजपने (BJP) विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (shivraj singh chauhan) आसाम दौऱ्यावर असून, एका जनसभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस गांधींच्या नाही, तर जिनांच्या मार्गावर चालला आहे, असा दावा चौहान यांनी केला आहे. (assam assembly election 2021 cm shivraj singh chouhan slams congress over various issues)

आसाममधील नाहरकटिया येथे एका जनसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस पक्ष केवळ SRP मध्ये अडकून राहिला आहे. S म्हणजे सोनिया गांधी, R म्हणजे राहुल गांधी आणि P म्हणजे प्रियंका गांधी, या शब्दांत चौहान यांनी निशाणा साधला.

जिनांच्या मार्गावर काँग्रेसचे मार्गक्रमण

राहुल गांधी यांनी आसाममध्ये अजमल यांच्या पक्षाशी गठबंधन का केले, केरळमध्ये मुस्लीम लीगसोबत गेले, तर पश्चिम बंगालमध्ये फुरफुरा शरीफ यांच्या पक्षाला पाठिंबा दिला. काँग्रेसला नेमकं काय झालंय, अशी विचारणा करत, काँग्रेस पक्ष आता महात्मा गांधी यांच्या नाही, तर जिनांच्या मार्गावर मार्गक्रमण करतोय, अशी टीका शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी बोलताना केली. 

"स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून"; कृषी मंत्र्यांचा टिकैतना टोला

काँग्रेस सर्वांत भ्रष्टाचारी पक्ष

केवळ भाजप असा पक्ष आहे, जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम झटत असतो, काम करत असतो. काँग्रेसने कधीही गरिबांसाठी काम केले नाही. तो सर्वांत भ्रष्टाचारी पक्ष आहे. केंद्रातील आणि राज्यातील कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर भारतीय जनता पक्षालाच मत द्या, असे आवाहन स्मृति इराणी यांनी यावेळी बोलताना केले.  

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून, हेलिकॉप्टरमधील काही तांत्रिक बिघाडामुळे शहांनी एका रॅलीला दृकश्राव्य माध्यमातून संबोधित केले. यावेळी शहांनी ममता बॅनर्जी सरकारवर टीका करत लवकरच बंगलामधून गुंडाराज संपेल, असा दावा केला आहे. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण