शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत मुख्यमंत्री; छत्तीसगडची धुरा भूपेश बाघेल यांच्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 6:33 AM

एकाच दिवशी तिन्ही शपथविधी; सचिन पायलट उपमुख्यमंत्री

नवी दिल्ली : राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री म्हणून खा. सचिन पायलट यांची नावे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी नक्की केली. छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची माळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेश बाघेल यांच्याच गळ्यात पडली आहे. या तिघांच्या नावांची घोषणा शुक्रवारी दिल्लीत करण्यात आली.याबाबत दिवसभर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी चर्चा सुरू होती. त्यानंतर, दुपारी राजस्थानसाठीचे काँग्रेसचे निरीक्षक खा. के. सी. वेणुगोपाळ यांनी गेहलोत व पायलट यांच्या नावाची घोषणा केली. त्या वेळी हे दोघेही उपस्थित होते. गेहलोत यापूर्वी दोनदा राज्याचे मुख्यमंत्री होते. ते ६७ वर्षांचे असून, ओबीसी समाजात त्यांना स्थान आहे.पायलट खासदार असून, यापूर्वी २00४ सालीही निवडून आले होते. गुज्जर समाजाचे पायलट उच्च विद्याविभूषित असून, ते ४१ वर्षांचे आहेत. सध्या ते राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष असून, त्यांचे वडील राजेश पायलट हेही काँग्रेसचे नेते होते. भूपेश बाघेल हे छत्तीसगड काँग्रेसचे अध्यक्ष असून, ते ५७ वर्षांचे आहेत. छत्तीसगडची स्थापना होण्याआधी ते मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळातही होते.राहुल गांधी उपस्थित राहणारअशोक गेहलोत, कमलनाथ व भूपेश बाघेल या तिघांचा शपथविधी सोमवारी होणार आहे. कमलनाथ यांचा शपथविधी भोपाळमध्ये सकाळी साडेदहा वाजता, जयपूरमध्ये अशोक गेहलोत यांचा शपथविधी दुपारी दीड वाजता आणि रायपूरमध्ये भूपेश बाघेल यांचा शपथविधी दुपारी साडेचार वाजता होणार आहे. या तिन्ही ठिकाणी राहुल गांधी हजर राहणार असून, कदाचित, सोनिया गांधीही उपस्थित राहतील.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीRajasthanराजस्थानChhattisgarhछत्तीसगडcongressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोतRahul Gandhiराहुल गांधी