शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

Asaram Case Verdict: जोधपूर पोलिसांनी 11 दिवसात असं गाठलं आसाराम बापूला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 1:04 PM

सुरूवातील कुटुंबाच्या तक्रारीवर मला विश्वास बसला नाही.

जोधपूर- स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला बुधवारी 2013मध्ये घडलेल्या बलात्कारी प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवलं. विशेष न्यायाधीश मधुसुधन शर्मा यांनी जोधपूर मध्यवर्ती कारागृह विशेष कोर्टात आसाराम बापूला दोषी ठरवलं. उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील असलेल्या आणि आसाराम बापूच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडातील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरजवळ असलेल्या मनाई भागातील आश्रमात बोलावून 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला. 1 सप्टेंबर 2013 रोजी आसाराम बापूला अटक करत त्याची रवानगी जोधपूर कोर्टात करण्यात आली होती. तेव्हापासून आसाराम न्यायालयीन कोठडीत आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुलीच्या तक्रारीनंतर जोधपूर पोलिसांनी 11 दिवसात संपूर्ण प्रकरणाचा छडा लावत आसारामला बेड्या ठोकल्या. 21 ऑगस्ट 2013 रोजी अल्पवयीन पीडित मुलगी, तिचे वडील दिल्ली पोलिसांच्या पथकासह पोलीस अधिकारी अजय लाल लांबा यांना भेटायला आले होते. त्यावेळी लांबा ऑफिसमध्ये होते. लांबा त्यावेळी पोलीस उपायुक्त होते. पीडित मुलीने त्यावेळी आसाराम बापूवर लैंगिक शोषणाचा आरोप करत तक्रार दाखल करण्याची मागणी केली. त्यासाठीच ती जोधपूर पोलीस स्टेशनमध्ये आली होती. 

'सुरूवातील कुटुंबाच्या तक्रारीवर मला विश्वास बसला नाही. एका मोठ्या व्यक्तीची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असं मला सुरूवातीला वाटलं. माझा विचार चुकीचा आहे हे दाखवून देण्यासाठी त्या मुलीने मला जोधपूरपासून 38 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मनाई गावातील आसारामच्या आश्रमाचा संपूर्ण नकाशा सांगितला. त्याच आश्रमात मुलीवर बलात्कार झाला होता. जेथे गुन्हा घडला त्या ठिकाणी गेल्याशिवाय खोलीचा नकाशा देणं अशक्य असल्याचं आमच्या लक्षात आलं. तिथूनच आमच्या तपासाला सुरूवात झाली, असं लांबा यांनी सांगितलं. त्यानंतर मेरठमधील एक कुटुंब आमच्या संपर्कात आलं. त्या कुटुंबानेही आसाराम बापूवर स्थानिक पोलिसात अशाच प्रकारची तक्रार दाखल करायला गेले होते. त्या कुटुंबाला भेटल्यावर पोलीस तक्रार दाखल करुन घ्यायला तयार नसल्याचं आम्हाला समजलं.  तिथूनच आसारामच्या गुन्ह्याचा दुसरा धागा आम्हाला सापडला. 

आसाराम बापू कुठे आहे? याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नव्हती. पण तरीही आम्ही आमचं एक पथक इंदूरमधील त्याच्या आश्रमात पाठवलं. आश्रमात पथक असताना आम्ही जोधपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आसाराम बापू आमच्या रडारवर असल्याचं माध्यमांना सांगितलं. ही गोष्ट आसारामला समजल्यावर 31 ऑगस्ट 2013 रोजी दुपारच्या सुमारास तो भोपाळ एअरपोर्सवर आला. ही माहिती आम्ही माध्यमांपर्यंत पोहचविली.नंतर माध्यमांनी त्यांचा पाठलाग करायला सुरूवात केली. इंदूरच्या आश्रमात पोलीस पथक असल्याची जराशीही कल्पना नसलेला आसाराम बापू इंदूर आश्रमात पोहचला. 

आसाराम व त्याच्या भक्तांनी आमिष दाखवून भुलविण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, तर भरमसाठ पैसा ते जीवे मारण्याची धमकी असं सगळं आसारामच्या समर्थकांनी केलं, असंही लांबा यांनी सांगितलं. आसारामला अटक केल्यानंतर लांबा यांना जीवे मारण्याची धमकी असलेली एकुण 1600 पत्रं मिळाली. 

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापू