आसाराम बापूला म्हातारचळ, नर्सची काढली छेड

By Admin | Updated: September 25, 2016 19:30 IST2016-09-25T17:58:35+5:302016-09-25T19:30:56+5:30

लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूच आता आणखी एक प्रकार चव्हाट्यावर आला

Asaram Bapu's old age, nurses removed from nurses | आसाराम बापूला म्हातारचळ, नर्सची काढली छेड

आसाराम बापूला म्हातारचळ, नर्सची काढली छेड

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 25 - अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूचा आता आणखी एक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. ८० वर्षांच्या आसाराम बापूचं शारीरिक वय वाढले तरी, मन काही कामवासनेतून सुटत नाही आहे. एम्स रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या नर्सला पाहून आसाराम बापूने अश्लील वक्तव्य केलं. रुग्णालयात बापूला नाश्ता घेऊन आलेल्या नर्सला पाहून 'तू लोण्यासारखीच आहेस, त्यामुळे मला ब्रेडसोबत लोणी कशाला हवे', असे वक्तव्य केले, असं वृत्त 'इंडिया कॉम'नं दिलं आहे. या वक्तव्यामुळे बापूचा चावटपणा उघड झाला आहे.
वैद्यकीय उपचारासाठी तिहार कारागृहातून आसाराम बापू दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल झाला. आसाराम बापू व्हील चेअर घेतल्याशिवाय दोन पावलेही चालू शकत नाही, अशी बापूची परिस्थिती आहे. इतकेच नव्हे तर, आसारामला उभे करण्यासाठी माणसांची गरज लागते. एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी डॉक्टरांनी आसाराम बापूला नाश्ता करण्यास सांगितले. डॉक्टरांच्या सूचनेनुसार आसारामसाठी नर्स लोणी आणि ब्रेड घेऊन आली. मात्र, शरीर थकले तरी मनाने अजूनही चिरतरुण असलेला आसाराम बापू नर्सला पाहताच गळपाटला. 'अगं तू स्वत:च इतकी लोण्यासारखी आहेस तर मग, ब्रेडसोबत लोणी कशाला? बहुतेक तू, काश्मीरची असावीस म्हणूनच तुझे गाल सफरचंदासारखे लालभडक आहेत,' असं बोलून आसारामनं त्या नर्सला धक्काच दिला.

Web Title: Asaram Bapu's old age, nurses removed from nurses