शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
4
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
5
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
6
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
9
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
10
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
11
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
12
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
13
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
14
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
15
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
16
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
17
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
18
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
19
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
20
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...

"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 16:55 IST

Asaduddin Owaisi on Pakistan and terrorism: भारताची दहशतवादविरोधी भूमिका जोरदारपणे मांडणे हेच उद्दिष्ट्य असेही ते म्हणाले

Asaduddin Owaisi on Pakistan and terrorism: AIMIM चे प्रमुख हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. "पाकिस्तान हा दहशतवादाचा प्रायोजक आहे. पाकिस्तानने आतापर्यंतच्या सर्व घटनांतून सिद्ध केले आहे की पाकिस्तान हा देश मानवतेसाठी धोका बनला आहे. भारताला आता आंतरराष्ट्रीय समुदायाला हे दाखवून द्यावे लागेल की गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी जात आहेत आणि हे खपवून घेतले जाणार नाही," असे ओवेसी शनिवारी एका मुलाखतीत म्हणाले.

"मुहम्मद झिया-उल-हक यांच्या काळापासून ते कंधार विमान अपहरण, २६/११ मुंबई हल्ला, संसदेवरील हल्ला, उरी, पठाणकोट, रियासी आणि अलिकडे पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्येपर्यंत पाकिस्तानची भूमिका स्पष्टपणे दिसून येते. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा (डीप स्टेट) आणि ISIS भारतात अस्थिरता पसरवण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. १९४७ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्लेखोर पाठवणे हे याचे पहिले उदाहरण होते. तेव्हापासून ते हेच करत आहेत आणि भविष्यातही तेच करत राहतील," असे ताशेरे ओवेसींनी पाकिस्तानवर ओढले.

सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशाबाबत...

केंद्र सरकारच्या सात जणांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात असदुद्दीन ओवेसी यांना एका शिष्टमंडळाचा सदस्य म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे. जागतिक व्यासपीठावर भारताची दहशतवादविरोधी भूमिका जोरदारपणे मांडणे हेच या शिष्टमंडळाचे उद्दिष्ट असणार आहे. याबाबत ओवेसी म्हणाले, "हे कोणत्याही पक्षाबद्दल नाही तर भारताबद्दल आहे. मी ही जबाबदारी गांभीर्याने घेईन. निघण्यापूर्वी एक सविस्तर बैठक घेतली जाईल. मी माझ्या देशासाठी योग्य तेच करेन. तसेच पाकिस्तान स्वतःला इस्लामिक राष्ट्र म्हणून जगासमोर सादर करत आहे हे योग्य नाही. भारतात सुमारे २० कोटी मुस्लिम राहतात. पाकिस्तानचा हा दावा मूर्खपणाचा आहे. हे जगाला सांगणे देखील महत्त्वाचे आहे.

मंत्री विजय शाह यांच्याबद्दल...

मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरही ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, कर्नल सोफिया ही देशाची कन्या आहे आणि ती आपल्या सशस्त्र दलांचा एक भाग आहे. मंत्र्यांचे वक्तव्य धर्माच्या आधारावर द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने आहे. भाजपने त्यांना बडतर्फ करावे आणि तुरुंगात पाठवावे. यामुळे जगाला संदेश जाईल की भारत कोणत्याही प्रकारचा जातीय द्वेष सहन करत नाही.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला