शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

'45 वर्षांची गुलामी फक्त यासाठी?', असदुद्दीन ओवैसींचा गुलाम नबी आझाद यांच्यावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 18:58 IST

गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा आक्षेप करत भाजपाशी कुठल्याही प्रकारची हात मिळवणी केल्याचे निष्पन्न झाले तर मी राजीनामा देईन, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अंतर्गत घडामोडी सुरू आहेत. तसेच राजकीयदृष्ट्या कमकुवत झालेल्या काँग्रेसमध्ये सध्या मोठा वाद उफाळून आला आहे. काही जेष्ठ नेत्यांनी सोनिया गांधीना पत्र लिहून नेतृत्व बदलाबाबत मागणी केली होती. त्यावरून या नेत्यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्याने काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते संतप्त झाले आहेत. 

गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा आक्षेप करत भाजपाशी कुठल्याही प्रकारची हात मिळवणी केल्याचे निष्पन्न झाले तर मी राजीनामा देईन, असे म्हटले आहे. यावरून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी गुलाम नबी आझाद यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्यावर लावलेले आरोप आज तुमच्यावर लावण्यात येत आहेत, असे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी यांसदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, "आदर्श न्याय, गुलाम नबी साहेब माझ्यावर असे आरोप करण्यात येत होते. आता आपल्यावरही हाच आरोप झाला आहे. 45 वर्षांची गुलामी फक्त या कारणासाठी? जाणवेधारी नेतृत्वाला विरोध करणार्‍या बी-टीमलाच बोलावले जाईल, हे आता सिद्ध झाले आहे. काँग्रेससोबत राहिल्यामुळे काय होते, हे मुस्लिम समाजातील लोक समजतील, अशी मला आशा आहे."

दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे जर मी भाजपाशी कुठल्याही प्रकारची हात मिळवणी केल्याचे निष्पन्न झाले तर मी राजीनामा देईन, असे थेट आव्हानच गुलाम नवी आझाद यांनी दिले आहे. तसेच असे पत्र लिहिण्याचे कारण हे काँग्रेसची कार्यसमिती होती, असेही त्यांनी सांगितले.पक्षामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी काही ज्येष्ठ नेत्यांनी लिहिलेले पत्र हा भाजपाशी केलेल्या हातमिळवणीचा परिणाम आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. तसेच या पत्राच्या वेळेवरही राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

कपिल सिब्बल यांनीही ट्विट करून राहुल गांधींना अतिशय आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं आहे. 'आम्ही भाजपाशी संगनमत केलंय, असं राहुल गांधी म्हणतात. राजस्थान उच्च न्यायालयात पक्षाची बाजू यशस्वीपणे मांडली. मणीपूरमध्ये भाजपा सरकारविरोधात पक्षाची बाजू मांडली. गेल्या ३० वर्षांत भाजपाच्या पथ्यावर पडेल, असं एकही विधान केलं नाही. तरी आम्ही भाजपाची हातमिळवणी केल्याचं म्हटलं जातं,' अशा शब्दांत सिब्बल यांनी स्पष्टपणे त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीपूर्वी पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांचा समावेश होता.सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय?देशभरातील काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी २३ नेत्यांनी पत्रातून केली. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असं २३ नेत्यांनी पत्रात म्हटलं आहे.काँग्रेस नेत्यांनी मांडल्या अडचणी-१. राज्य काँग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तांमध्ये नाहक विलंब.२. सन्मान आणि स्वीकारार्ह असलेल्या नेत्यांच्या प्रदेश काँग्रेसवर नियुक्त्या होत नाहीत.३. राज्य प्रमुखांना संघटनेशी संबंधित निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही.४. युथ काँग्रेस आणि एनएसयूआयमधील निवडणुकांमुळे संतुलन बिघडलं.काँग्रेस नेत्यांच्या मागण्या काय?१. नेतृत्वात स्थायी आणि प्रभावी बदल व्हावेत.२. काँग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणूक व्हाव्यात३. पक्षानं गमावलेली ताकद परत मिळवण्यासाठी योजना गरजेची४. संघटनेतील प्रत्येक स्तरावर निवडणूक व्हावी५. संसदीय पार्टी बोर्डाची स्थापना व्हावी.६. प्रदेश काँग्रेसला ताकद दिली जावी.पत्रावर कोणाच्या स्वाक्षऱ्या?राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाम, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, खासदार विवेक तनखा, अकउउ आणि उहउ चे मुकुल वासनिक आणि जितिन प्रसाद, माजी मुख्‍यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, राजेंद्र कौर भटट्ल, वीरप्‍पा मोइली, पृथ्‍वीराज चव्‍हाण, पी. जे. कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी आणि मिलिंद देवरा, प्रदेशाध्यक्ष सांभाळण्याचा अनुभव असलेले राज बब्‍बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह यांच्यासह अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्‍त्री आणि संदीप दीक्षित.

आणखी बातम्या..."राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात, म्हणून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा"    - महेंद्रसिंग धोनीला पाहिलं की येते नवऱ्याची आठवण - सानिया मिर्झा    - बापरे! 'ही' भाजी 1200 रुपयांना विकली जाते, दोन दिवसांत होते खराब    गाढवीनीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू होतेय, एक लिटरची किंमत ७००० रुपये, जाणून घ्या फायदे!    - आता वाहन नोंदणीचे नियम कडक होणार; मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल    - ट्रेनचे तिकिट बुकिंग विनामूल्य! जाणून घ्या, SBI-IRCTC कार्डचे १० शानदार फायदे!!    

 

टॅग्स :congressकाँग्रेसAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी