"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:41 IST2025-08-11T13:40:35+5:302025-08-11T13:41:22+5:30
Shashi Tharoor News: जोपर्यंत लोकांच्या मनात निवडणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील. तोपर्यंत निवडणूक आयोगाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत राहणार आहे. जेव्हा असे संशय दूर होती. तेव्हा निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा आणि विश्वसनीयता परत मिळेल. या प्रश्नांची उत्तरं देण्यामध्येच निवडणूक आयोगाचं हित सामावलेलं आहे.

"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्षांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या मोर्चादरम्यान, काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनीही निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काढलेल्या मोर्चामध्ये सहभागी झालेले शशी थरूर म्हणाले की, जोपर्यंत लोकांच्या मनात निवडणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील. तोपर्यंत निवडणूक आयोगाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत राहणार आहे. जेव्हा असे संशय दूर होती. तेव्हा निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा आणि विश्वसनीयता परत मिळेल. या प्रश्नांची उत्तरं देण्यामध्येच निवडणूक आयोगाचं हित सामावलेलं आहे.
शशी थरूर पुढे म्हणाले की, माझ्यासाठी हा मुद्दा अगदी स्पष्ट आहे. राहुल गांधी यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्यांची उत्तरं मिळणं आवश्यक आहे. ही निवडणूक आयोगाची देशाप्रति असलेली जबाबदारी आहे. सोबतच निवडणुकीच्या विश्वासार्हतेबाबत लोकांच्या मनात कुठलाही संशय राहू नये हे निवडणूक आयोगाचं उत्तरदायित्व आहे. तसेच ते देशासाठी महत्त्वपूर्ण आहे, असेही त्यांनी सांगितले.