Aryan Khan drugs case : WhatsApp चॅट हा दोघांमधला 'गोपनीय' संवाद असतो ना?; मग बॉलिवूडकरांचं चॅट दरवेळी 'लीक' कसं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 04:16 PM2021-10-22T16:16:32+5:302021-10-22T16:45:56+5:30

रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअपचे चॅट लीक झाल्यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोनचे नाव समोर आले होते. आता, आर्यन खान प्रकरणात व्हॉट्सअप चॅटमधूनच अन्यन्या पांडेचं नाव समोर आलं.

Aryan Khan drugs case : If WhatsApp chats are end-to-end encrypted why do Bollywood chats keep leaking all the time | Aryan Khan drugs case : WhatsApp चॅट हा दोघांमधला 'गोपनीय' संवाद असतो ना?; मग बॉलिवूडकरांचं चॅट दरवेळी 'लीक' कसं होतं?

Aryan Khan drugs case : WhatsApp चॅट हा दोघांमधला 'गोपनीय' संवाद असतो ना?; मग बॉलिवूडकरांचं चॅट दरवेळी 'लीक' कसं होतं?

Next
ठळक मुद्देव्हॉट्सअप एन्ड-टू-एन्ड कार्यप्रणालीचा वापर करते. तरीही, बॉलिवूडमधील कलाकारांचे हे चॅट लीक कसे होतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

नवी दिल्ली - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमधील ड्रग्ज वापराचा मुद्दा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीचं नाव पुढे आलं होतं. त्यानंतर, आता आर्यन खानच्या अटकेनंतर अनन्या पांडेचं नाव समोर येत आहे. आर्यनच्या व्हॉट्सअप चॅटमधून अनन्या पांडेचं नाव समोर आल्याने एनसीबीने तिला चौकशीसाठी बोलावले होते. त्यामुळे, पुन्हा एकदा व्हॉट्सअप चॅटचा मुद्दा समोर आला आहे. मात्र, व्हॉट्सअप एन्ड-टू-एन्ड कार्यप्रणालीचा वापर करते. तरीही, बॉलिवूडमधील कलाकारांचे हे चॅट लीक कसे होतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअपचे चॅट लीक झाल्यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोनचे नाव समोर आले होते. आता, आर्यन खान प्रकरणात व्हॉट्सअप चॅटमधूनच अन्यन्या पांडेचं नाव समोर आलं. त्यानंतर, एनसीबीने अनन्याला नोटीस बजावली आहे. मात्र, व्हॉट्सअप सुरक्षित फिचर असतानाही, हे व्हॉट्सअप चॅट लीक कसे होतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. व्हॉट्सअपने एन्ड-टू-एन्ड एनक्रीप्टेड फिचर्सचा वापर केला आहे. म्हणजेच, व्हॉट्सअप चॅटचा दोघांमधील गोपनीय संवाद तिसऱ्या कुणालाही वाचता येत नाही, विशेष म्हणजे व्हॉट्सअपलाही तो संवाद वाचता येत नाही. मग, दरवेळी बॉलिवूडमधील कलाकरांचेच चॅट लीक कसे होतात?

फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअप कंपनीने यापूर्वीही जाहीर केले होते की, व्हॉट्सअपमधील चॅट संवाद हा दोन व्यक्तींमधील गोपनीय संदेश आहे. केवळ मेसेज पाठवणारा आणि ज्याला तो मेसेज पाठवला आहे, ते दोघेच हा संदेश वाचू शकतात. इतर कोणालाही तो संदेश वाचता येणार नाही. व्हॉट्सअपचे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन सिग्नल प्रोटोकॉलचा वापर करते. त्यामुळे, तिसऱ्या व्यक्तीपर्यंत किंवा व्हॉट्अस व फेसबुकपर्यंत हा संदेश किंवा कॉल पोहोचू शकत नाही. 

व्हॉट्सअप मेसेज दीर्घकाळ राहत नाही

"व्हॉट्सअपमध्ये संदेशांची सामग्री पाहण्याची किंवा एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड कॉल ऐकण्याची क्षमता नाही. कारण, व्हॉट्सअपवर पाठवलेल्या आणि प्राप्त झालेल्या संदेशांचे एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन संपूर्णपणे तुमच्या डिव्हाइसवर होते. एखादा मेसेज तुमच्या डिव्हाइसवर सोडण्यापूर्वी, तो एका क्रिप्टोग्राफिक लॉकसह सुरक्षित असून केवळ प्राप्तकर्त्याकडेच त्याची चावी आहे. याव्यतिरिक्त, पाठवलेल्या प्रत्येक संदेशासह त्याचा पासवर्ड बदलतो. तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील सुरक्षा पडताळणी कोड तपासून तुमचे संभाषण सुरक्षित असल्याची खात्री करू शकता. ज्यास व्हॉट्सअप FAQ पेज स्टेटस असे म्हणतात. तथापि, व्हॉट्सअपच्या FAQ पेजमध्ये असे कुठेही नमूद केलेले नाही की मेसेजिंग अॅप कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत संदेश सामग्री सामायिक करते. कारण, व्हॉट्सअप मेसेज डिलिव्हर झाल्यावर किंवा डिलिव्हरी केलेल्या मेसेजेसचे ट्रान्झॅक्शन दीर्घकाळासाठी संग्रहीत राहत नाही. वितरित न केलेले संदेश 30 दिवसांनी व्हॉट्सअप सर्व्हरवरून हटवले जातात. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, जे डीफॉल्टनुसार सक्रिय केले जाते, व्हॉट्सअप वापरकर्त्यांच्या चॅटमध्ये प्रवेश करण्याची कुणालाही परवानगी देत नाही.

व्हॉट्अअप चॅट लीक नव्हे, तर अधिकाराने मिळते

व्हॉट्सअपचे फिचर हे एन्ड-टू-एन्ड एन्क्रीप्टेड असले तरी, आपत्कालीन परिस्थितीत केंद्रीय तपास यंत्रणा संबंधित व्यक्तींच्या चॅटची मागणी कंपनीकडे करू शकतात. तपास यंत्रणांच्या मागणीला प्रतिसाद देताना, कंपनीकडून कायदेशीर बाबींच्या आधारे, डेटा स्टोअर सेंटरमधून संबंधित व्यक्तींच्या चॅटची, ग्रुपची आणि प्रोफाईलची माहिती कायदेशीर धोरणाचा अवलंब करुन तपास यंत्रणांना पुरविण्यात येऊ शकते. त्यातूनच, तपास यंत्रणांना हे चॅट मिळते. त्यामुळे, हे चॅट लीक होत नसून कायदेशीर अधिकार वापरुनच कंपनींकडून मिळवले जातात.

Read in English

Web Title: Aryan Khan drugs case : If WhatsApp chats are end-to-end encrypted why do Bollywood chats keep leaking all the time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.