केजरीवाल सरकारने 382 कोटी रुपयांचा आरोग्य घोटाळा केला; काँग्रेसचा धक्कादायक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 14:41 IST2025-01-22T14:40:51+5:302025-01-22T14:41:59+5:30

कॅगच्या अहवालातून केजरीवालांचा भ्रष्टाचार समोर आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

Arvind Kejriwal's government committed a health scam worth Rs 382 crore; Congress makes shocking allegations | केजरीवाल सरकारने 382 कोटी रुपयांचा आरोग्य घोटाळा केला; काँग्रेसचा धक्कादायक आरोप

केजरीवाल सरकारने 382 कोटी रुपयांचा आरोग्य घोटाळा केला; काँग्रेसचा धक्कादायक आरोप

Congress on AAP : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप आणि भाजपसह आप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच, काँग्रेसचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अजय माकन यांनी बुधवारी(22 जानेवारी) पत्रकार परिषदेतून अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर गंभीर आरोप केले. 

आरोग्य विभागात घोटाळाचा आरोप
अजय माकन म्हणाले की, दिल्लीबाबत कॅगच्या अहवालांपैकी एक अहवाल अत्यंत गंभीर आहे. राष्ट्रीय राजधानीत 382 कोटी रुपयांचा आरोग्य घोटाळा झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या राजवटीत दिल्लीत तीन रुग्णालयांचे बांधकाम सुरू झाले होते, परंतु केजरीवाल सरकारच्या काळात त्यांच्या बांधकामाला सतत विलंब होत गेला, त्यामुळे निविदांचे पैसे वाढतच गेले. केजरीवाल सरकारने या भ्रष्टाचाराबाबत उत्र द्यावे.

'आप के पाप' मोहिमेचा शुभारंभ
अजय माकन पुढे म्हणतात, इंदिरा गांधी रुग्णालय, बुरारी रुग्णालय आणि मौलाना आझाद दंत रुग्णालयाच्या बांधकामात भ्रष्टाचार झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक 314 कोटी रुपयांची गुंतवणूक निविदेद्वारे इंदिरा गांधी रुग्णालयाच्या बांधकामात करण्यात आली. दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात पक्ष स्थापन केला गेला. त्यावेळी एक नेता कॅगचा अहवाल आणून काँग्रेसच्या विरोधात आवाज उठवत असे, पण आता तोच कॅग अहवाल त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत सांगत आहे. आप के पाप या नावाने आम्ही सातत्याने मोहीम राबवत आहोत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

Web Title: Arvind Kejriwal's government committed a health scam worth Rs 382 crore; Congress makes shocking allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.