'ज्या देशाचे गृहमंत्री अमित शाह त्या देशाचं काय होणार', केजरीवालांचं 'ते' ट्विट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 15:26 IST2019-12-17T15:25:29+5:302019-12-17T15:26:47+5:30
केजरीवाल यांनी ट्विटमध्ये अमित शाह देशाचे गृहमंत्री झाल्यास काय होईल याची भविष्यवाणी केली होती.

'ज्या देशाचे गृहमंत्री अमित शाह त्या देशाचं काय होणार', केजरीवालांचं 'ते' ट्विट व्हायरल
नवी दिल्ली - देशात एनआरसी आणि नागरिकता संशोधन विधेयकावरून गदारोळ सुरू आहे. देशात अस्थिरता निर्माण झाली असून ठिकठिकाणी हिंसक घटना घडत आहे. तरुण वर्ग केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध रस्त्यावर उतरला आहे. अनेक सेलिब्रेटी देखील सरकारविरुद्ध बोलताना दिसत आहेत. त्यातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे 10 मे 2019 रोजी गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी केलेले ट्विट व्हायरल होत आहे.
केजरीवाल यांनी ट्विटमध्ये अमित शाह देशाचे गृहमंत्री झाल्यास काय होईल याची भविष्यवाणी केली होती. त्या ट्विटचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. याची पडताळणी केली असता हे ट्विट पूर्णपणे खरे असल्याचे समोर आले आहे. त्यावेळी केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीत विचार करून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले होते.
देशवासियों, वोट देते वक़्त सोचना। अगर मोदी जी दोबारा आ गए तो अमित शाह गृह मंत्री होंगे। जिस देश का गृह मंत्री अमित शाह हो, उस देश का क्या होगा, ये सोच के वोट डालना। https://t.co/ws2ZCA7hjv
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 10, 2019
केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, देशवासियांनो मतदान करताना थोडा विचार करा. देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी निवडून आले तर भाजप अध्यक्ष अमित शाह गृहमंत्री होतील. ज्या देशाचे गृहमंत्री अमित शाह होतील, त्या देशाच काय होणार याचा विचार करूनच मतदान करा, असं आवाहन केजरीवाल यांनी देशातील नागरिकांना केले होते. अर्थात केजरीवाल यांनी अमित शाह यांच्याविषयी केलेली भविष्यवाणी खरी झाली आहे.