शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित/ केजरीवाल यांची नेतेपदी निवड केजरीवाल राज्यपालांना भेटले; सरकारसाठी दावा

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन सरकार स्थापण्याचा दावा केला.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन सरकार स्थापण्याचा दावा केला.
केजरीवाल यांच्यासोबत मनीष सिसोदिया हे होते. त्यांनी जंग यांच्यासोबत २५ मिनिटे चर्चा केली. नायब राज्यपाल नवे सरकार स्थापण्याची औपचारिकता पूर्ण करण्याबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे शिफारशीसह अहवाल पाठविणार असल्याचे राजभवनाने एका निवेदनात नमूद केले. तत्पूर्वी नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत आपचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला आमदारांनी एकमताने पाठिंबा दिला.
-------------------------------
सभ्यपणा बाळगा- आमदारांना सल्ला
कॉन्स्टट्यिूशन क्लब येथे बैठकीला संबोधित करताना केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपचा पराभव केल्याबद्दल सर्व पक्ष आमदारांचे अभिनंदन करतानाच त्यांना सभ्यपणा बाळगण्याचा सल्ला दिला. अरेरावीमुळेच काँग्रेस पक्ष आज शून्यात जमा झाला आहे. केंद्रातील भाजपलाही अरेरावी नडली आहे. त्यामुळे आपल्या कृतीतून कोणत्याही प्रकारे उद्धटपणा दिसू देऊ नका. तुम्हाला मिळालेल्या जनादेशाचा आदर करा, असेे ते म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.