'आज देशाच्या संविधानावर अभिमान वाटतो', निर्दोष सुटल्यानंतर मनीष सिसोदियांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:18 IST2026-02-27T12:16:32+5:302026-02-27T12:18:34+5:30
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल-सिसोदिया निर्दोष; पटियाळा हाउस कोर्टाचा मोठा निर्णय

'आज देशाच्या संविधानावर अभिमान वाटतो', निर्दोष सुटल्यानंतर मनीष सिसोदियांची पहिली प्रतिक्रिया
नवी दिल्ली-दिल्लीतील कथित मद्य(अबकारी) धोरण घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पटियाळा हाऊस न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी आज(दि.27) केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यासह 23 आरोपींची निर्दोष मुक्त केले. कोर्टाचा निर्णय जाहीर होताच दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पहिली प्रततिक्रिया दिली.
VIDEO | AAP leader Manish Sisodia (@msisodia) after appearing before Rouse Avenue Court in connection with the Delhi Excise Policy case, said,
— Press Trust of India (@PTI_News) February 27, 2026
"We are once again proud of our Constitution and BR Ambedkar who gave us such a Constitution. Truth has won again."
(Full video… pic.twitter.com/ZfWTlijgEq
संविधानावर पुन्हा अभिमान वाटतो..
या प्रकरणात मुक्त झाल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, आम्हाला आज पुन्हा एकदा आमच्या संविधानाचा आणि आम्हाला असे संविधान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान वाटतो. सत्याचा पुन्हा एकदा विजय झाला आहे.
केजरीवाल भावुक...
कोर्टाच्या निर्णयानंतर मीडियाला प्रतिक्रिया देताना आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले, मागील काही वर्षांपासून भारतीय जनता पार्टीकडून कथित मद्य घोटाळ्याचे आरोप आमच्यावर करण्यात येत होते. आज न्यायालयाने हे सर्व आरोप फेटाळून लावत आम्हा सर्वांना निर्दोष ठरवले आहे. आम्हाला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे. आज सत्याचा विजय झाला आहे. यादरम्यान, केजरीवाल सिसोदिया यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले.
VIDEO | AAP national convenor Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) breaks down as he addresses media after appearing before Rouse Avenue Court over the Delhi Excise Policy case. He says, "For the past few years, the way BJP has been accusing us in the Delhi excise policy case, today… pic.twitter.com/jtREb0JyVi
— Press Trust of India (@PTI_News) February 27, 2026
हा संपूर्ण खटलाच बनावट
केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका करताना सांगितले की, आणच्याविरोधात कट रचण्यात आला होता. AAP ला संपवण्यासाठी आमच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. एका विद्यमान मुख्यमंत्र्यालाही अटक करण्यात आली. टीव्ही चॅनेल्सवर आम्हाला भ्रष्ट ठरवण्यात आले. प्रत्यक्षात हा संपूर्ण खटलाच बनावट होता. केजरीवाल भ्रष्ट नाही. मी आयुष्यात फक्त प्रामाणिकपणा कमावला आहे.
आतिशी यांचा भाजपवर हल्ला...
न्यायालयाच्या निर्णयानंतर, माजी मुख्यमंत्री आणि आपच्या आमदार आतिशी यांनी भाजपवर हल्ला चढवला. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, सत्यमेव जयते! कितीही खोटे आरोप केले, कितीही अत्याचार केले, तरी शेवटी सत्याचाच विजय झाला. आज संपूर्ण देश भाजपचा कट आणि अरविंद केजरीवाल यांचा कट्टर प्रामाणिकपणा पाहत आहे.