शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आणीबाणीवरुन जेटलींचा निशाणा; इंदिरा गांधींची हिटलरशी तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 16:41 IST

आणीबाणीला 43 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जेटलींची फेसबुक पोस्ट

नवी दिल्ली : इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीला 43 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणीबाणीच्यावेळी माध्यमांच्या स्वातंत्र्यावर बंधनं लादण्यात आली होती. याशिवाय विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. यावरुन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जर्मनीचा हुकूमशहा हिटलरशी केली आहे. जेटली यांनी आणीबाणीच्या निमित्तानं फेसबुक पोस्टमधून इंदिरा गांधींवर निशाणा साधला आहे. हिटलर आणि इंदिरा गांधी या दोघांनीही घटनेच्या चिंधड्या उडवल्या होत्या, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'त्या दोघांनीही (हिटलर आणि इंदिरा गांधींनी) लोकांसाठी तयार करण्यात आलेल्या घटनेचं रुपांतर हुकूमशाहीच्या घटनेत केलं. हिटलरनं संसदेतील बहुसंख्य विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबलं होतं. आपलं अल्पमतात गेलेलं सरकार हिटलरनं आणीबाणीचा आधार घेऊन दोन तृतीयांश मतांनी वाचवलं होतं,' असं जेटलींनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कृती हिटलरसारखीच होती, असं जेटलींनी त्यांच्या पोस्टमध्ये अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे. 'इंदिरा गांधींनीदेखील विरोधी पक्षातील बहुसंख्य नेत्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांनी या नेत्यांच्या अनुपस्थितीत संसदेत दोन तृतीयांश बहुमत सिद्ध केलं आणि घटनेत अनेक बदल केले. यामुळे उच्च न्यायालयाचा पुनर्विचार याचिका दाखल केल्याचा अधिकार काढून घेण्यात आला,' असं जेटली यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या घटनेचा आत्माच या बदलांमुळे संपुष्टात आला. याशिवाय इंदिरा गांधींनी कलम 368 मध्येही बदल केला. त्यामुळे संविधानात केलेले बदल न्यायपालिकेच्या कक्षेतून दूर गेले,' असं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे. 

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीBJPभाजपाIndira Gandhiइंदिरा गांधीcongressकाँग्रेसDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरPoliticsराजकारणFacebookफेसबुक