शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

Arun Jaitley Death: राजकीय निवृत्तीनंतरही मोदींच्या पाठीशी भक्कम उभे होते जेटली!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 1:29 PM

एम्स रुग्णालयामार्फत पत्रक जारी करुन अरुण जेटली यांचे निधन झाल्याचे कळविण्यात आले.

नवी दिल्ली - नोटाबंदी आणि जीएसटी यांसारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान मोदींच्या पाठिशी कायम ठामपणे उभे असणारे नेते अरुण जेटली होते.  

एम्स रुग्णालयामार्फत पत्रक जारी करुन अरुण जेटली यांचे निधन झाल्याचे कळविण्यात आले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुपारी 12.07 मिनिटांनी जेटलींनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर देशातील राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त करण्यात येत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार आधीपेक्षा जास्त बहुमताने निवडून आले. तथापि, जेटली यांनी प्रकृतीच्या कारणामुळे या सरकारमध्ये सहभागी होण्याचे नाकारले. 29 मे 2019 रोजी त्यांनी एक पत्रच त्यासाठी मोदी यांना लिहिले. सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले असले तरी समाजमाध्यमांवर ते सक्रिय होते. समाजमाध्यमांतून ते मोदी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करीतच राहिले. घटनेतील 370 व 35 अ कलम हटविण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी पोस्ट त्यांनी नुकतीच टाकली होती. जम्मू आणि काश्मीरच्या निर्णयाबाबत सुषमा स्वराज यांच्याप्रमाणेच अरुण जेटलींनीही मोदींचं अभिनंदन केलं होतं. 

पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांनी अशक्य ते शक्य करुन दाखवलं, असं ट्विट जेटलींनी केलं होतं. मोदींच्या या निर्णयाचं स्वागत जेटलींनी केलं होतं.  मोदी आणि अमित शहांनी इतिहास घडवला. तसेच, मोदी है तो मूमकीन है, हे सिद्धही करुन दाखवल्याचं जेटलींनी म्हटलं होतं. कलम 370 आणि 35 ए हटविल्यानंतर जेटलींना अत्यानंद झाला होता. त्यामुळेच, आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सातत्याने ट्विट करत जेटलींनी या विधेयकाचे समर्थन केले होते. 

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाDeathमृत्यूArticle 35 Aकलम 35-एArticle 370कलम 370