शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

भय, शांतता अन् दहशत! बकरी ईदच्यापूर्वी काश्मिरी लोकांच्या मनात काय चाललं आहे? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 10:47 AM

पंतप्रधानांनी ईदच्या शुभेच्छा काश्मिरी लोकांना दिल्या असल्या तरी ईदचा उत्सव पूर्वीसारखा साजरा करायला मिळेल की नाही याची भीती लोकांच्या मनात आहे. 

श्रीनगर - माजी सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी लैला जबीन यांचे कुटुंब दरवर्षी ईद-उल-अजहाच्या वेळी बकऱ्यांची कुर्बानी देत असतं. मात्र यावेळी ते बोकड अथवा बकरी विकत घेऊ शकणार नाहीत. तर दुसरीकडे फारुक जान या गोष्टीने चिंतेत आहेत की त्यांच्या पत्नीचे डायलिसिसच वेळेवर होईल का नाही? कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमधल्या लोकांचे आयुष्य त्यांच्या घरामध्येच कैद झाल्याचं चित्र आहे. रस्त्यावर शांतता पसरली आहे. बाजारांमध्ये असणारी गर्दी गायब झाली आहे. सण जवळ आला तरी त्या उत्सवाची तयारी करण्याऐवजी लोकांच्या मनात संशयाचं वातावरण तयार झालं आहे. पंतप्रधानांनी ईदच्या शुभेच्छा काश्मिरी लोकांना दिल्या असल्या तरी ईदचा उत्सव पूर्वीसारखा साजरा करायला मिळेल की नाही याची भीती लोकांच्या मनात आहे. 

300 खाटांचे रुग्णालय असणाऱ्या एसएमएचएस हॉस्पिटलमधील एका डॉक्टराने सांगितले की, सध्याच्या वातावरणात मला रुग्णांवर उपचार करणे कठीण जात आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी मी कर्फ्यूमधून मार्ग काढत रोज हॉस्पिटला येतो. मी जर हॉस्पिटलला आलो नाही तर माझ्या रुग्णांचे काय होणार? असा विचार माझ्या मनात येतो. जम्मू काश्मीरमधील लोकांसोबत असं व्हायला नको. फारुक यांच्या पत्नीला डायलिसिस करण्याची आवश्यकता भासते. एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना फारुक यांनी सांगितले की, पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून दोन फर्फ्यूचे पास मिळाले आहेत. अशा स्थितीत त्यांना पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं. अशा परिस्थितीत राहिल्याने मनाला शांती मिळत नाही. 

श्रीनगरनजीक सोलिना येथे राहणारे मंजोर अहमद सांगतात की, ईदचा सण जवळ येत आहे. मात्र अद्यापही शहरातील परिस्थिती सुधारण्याचे काही संकेत दिसत नाही. त्यामुळे ईदचा सण यंदा साजरा करु शकणार नाही अशी मानसिकता बनवायला हवी. एकीकडे प्रशासनाकडून दावा केला जातोय की, जम्मू काश्मीरमधील स्थिती पहिल्यापेक्षा अधिक चांगली झाली आहे. स्थिती नियंत्रणात आहे. मात्र लोकांनी हा दावा फेटाळून लावला आहे. माध्यम प्रतिनिधींनाही परिसरात कर्फ्यूचे पास न देण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याचं पोलिसांनी एका पत्रकाराला सांगण्यात आलं.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Narendra Modiनरेंद्र मोदीSection 144जमावबंदी