नवी दिल्ली : शिवसेनेने बिहारमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून या निवडणुकीत रालोआचा घटक असणार नाही, लवकरच जागांची घोषणा केली जाईल, असे या पक्षाचे खा. संजय राऊत यांनी रविवारी स्पष्ट केले. आम्हाला अन्य पक्षांशी देणे-घेणे नाही. मतांचे विभाजन टाळण्याचा विचार केला जात असेल तर त्यांनी आम्हाला सन्मानाने जागा द्याव्यात, असा इशाराही त्यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून खा. राऊत आणि खा. अनिल देसाई यांनी बिहारचे दौरे चालविले असून पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या रॅली आयोजित करण्यासाठी चाचपणी सुरू आहे.
सेना बिहारमध्ये स्वबळावर लढणार
By admin | Updated: September 14, 2015 01:15 IST