विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 16:31 IST2025-08-03T16:29:49+5:302025-08-03T16:31:12+5:30

श्रीनगर विमानतळावर स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप एका लष्करी अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे.

Army officer assaults SpiceJet staff at airport; spinal cord fractured | विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

श्रीनगर विमानतळावर एका लष्करी अधिकाऱ्याने विमान कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. एक लष्करी अधिकारी स्पाइसजेटच्या एसजी-३८६ या विमान क्रमांकाने श्रीनगरहून दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचला होता. या लष्करी अधिकाऱ्याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २६ जुलैची आहे. लष्करी अधिकारी १६ किलो वजनाच्या दोन केबिन बॅगांसह विमानात चढण्याचा प्रयत्न करत होता. परंतु चेक-इन दरम्यान स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांनी त्याला रोखले. प्रत्यक्षात, विमानात फक्त ७ किलो वजनाच्या केबिन बॅगच नेण्याची परवानगी आहे.

Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल

अधिकाऱ्याला जास्त पैसे मागितल्याने राग आला

७ किलोपेक्षा जास्त वजन वाहून नेण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात. ही माहिती लष्करी अधिकाऱ्यालाही देण्यात आली. त्यांना जास्त पैसे देऊन चेक-इन पूर्ण करण्यास सांगण्यात आले. पण या सूचनेचा त्या लष्करी अधिकाऱ्याला राग आला. सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन करून त्याने बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण न करता जबरदस्तीने एअरोब्रिजमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी त्या अधिकाऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा त्याने तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. स्पाइसजेटने सांगितले की, त्यांचा एक कर्मचारी जमिनीवर बेशुद्ध पडला, परंतु आरोपीने त्याला लाथा आणि ठोसे मारणे सुरूच ठेवले. आरोपीने इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. एका कर्मचाऱ्याला पाठीचा कणाही फ्रॅक्चर झाला. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्पाइसजेटने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली आहे. लष्करानेही या घटनेची दखल घेतली आहे आणि या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. स्पाइसजेट आरोपींना नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याचीही तयारी करत आहे.

Web Title: Army officer assaults SpiceJet staff at airport; spinal cord fractured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.