चुकून झाडली गेलेली गोळी लागून लष्करी जवानाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 15:16 IST2024-03-05T15:16:20+5:302024-03-05T15:16:42+5:30

नौशेरा येथे नियंत्रण रेषेवर ही घटना घडली. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी अँटी-इन्फ्लिट्रेशन ऑबस्टॅकल सिस्टिम कार्यान्वित केली आहे.

Army jawan dies due to accidental firing | चुकून झाडली गेलेली गोळी लागून लष्करी जवानाचा मृत्यू

प्रतिकात्मक फोटो...

राजौरी/जम्मू : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सोमवारी एका लष्करी जवानाचा त्याच्याकडील सर्व्हिस रायफलमधून चुकून झाडली गेलेली गोळी लागल्याने मृत्यू झाला. लान्स नायक बलवीर सिंह असे त्यांचे नाव आहे. 

नौशेरा येथे नियंत्रण रेषेवर ही घटना घडली. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी अँटी-इन्फ्लिट्रेशन ऑबस्टॅकल सिस्टिम कार्यान्वित केली आहे. तिथे बलवीर सिंह तैनात होते. चुकून झाडली गेलेली गोळी लागून ते जागीच ठार झाले.

Web Title: Army jawan dies due to accidental firing