Video : फक्त माणसांनी नव्हे तर प्राण्यांनीही केला योगा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 10:45 IST2019-06-21T10:45:06+5:302019-06-21T10:45:34+5:30

भारतीय जवानांनीही योग दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला

Army Dog Unit performs Yoga, along with security forces across the country | Video : फक्त माणसांनी नव्हे तर प्राण्यांनीही केला योगा 

Video : फक्त माणसांनी नव्हे तर प्राण्यांनीही केला योगा 

नवी दिल्ली - 5 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस संपूर्ण देशभरात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही झारखंडमधील रांची येथे 40 हजार लोकांच्या उपस्थितीत योगसाधना केली. भारतीय जवानांनीही योग दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. कोणी आयएनएस युद्ध नौकेवर तर कोणी हिमालयातील बर्फाच्या डोंगरामध्ये योग करुन योग दिन साजरा केला. 

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स(BSF) च्या डॉग स्कॉड पथकातील कुत्र्यांनी प्रशिक्षकांसोबत योगा केल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले. 


इंडि तिबेटीयन पोलिसांनी(ITBP) रोहतांग पासच्या सीमेवर योगा केला. त्याठिकाणी 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान होतं. 


 

हरयाणातील बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी गुरुग्राम येथे घोड्यांच्या पाठीवर बसून योगाची प्रात्यक्षिके सादर केली. 


 

इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांनी लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर जाऊन 20 अंश सेल्सिअस तापमानात योगा केला. 


भारतीय नौदलातील जवानांनी आयएनएस विराटवर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. 



 



 

Web Title: Army Dog Unit performs Yoga, along with security forces across the country