महू - भारताच्या सशस्त्र दलांनी सुरक्षेसंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. मग तो अल्पकालीन संघर्ष असो की पाच वर्षापर्यंत चालणारे युद्ध. कारण सध्याच्या वातावरणात अनिश्चिततेचे प्रमाण खूप अधिक आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सांगितले.
महू येथे सुरू असलेल्या रणसंवाद या परिषदेत ते म्हणाले की, फक्त सैन्याची संख्या किंवा शस्त्रसाठ्याच्या बळावर आता युद्ध जिंकता येणार नाही. सायबर युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ड्रोन आणि उपग्रह आधारित टेहळणी यासारख्या गोष्टी भविष्यातील युद्धांचे स्वरूप ठरवत आहेत.
आर्मी वॉर कॉलेजमध्ये झालेल्या या परिषदेच्या शेवटच्या दिवशी ते म्हणाले की. अचक लक्ष्य करणारी शस्त्रे रिअल टाइम गुप्तचर माहिती आणि डेटावर आधारित निर्णयप्रणाली ही आता कोणतेही युद्ध जिंकण्यासाठी मुख्य साधने ठरत आहेत.
आजच्या काळात युद्ध इतके अचानक आणि अनिश्चित वळण घेते की ते किती काळ चालेल, याचा अंदाज बांधणे फार कठीण झाले आहे. याचा अर्थ असा की जर युद्ध दोन महिने, चार महिने, एक वर्ष, दोन वर्षे किंवा पाच वर्षेही चालेल, तरी आपण त्यासाठी पूर्णतः सज्ज असले पाहिजे. (वत्तसंस्था)
युद्ध विस्तारले सायबर स्पेसपर्यंतसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, आधुनिक युद्ध आता केवळ जमीन, समुद्र आणि आकाशापुरते मर्यादित राहिलेले नाही; ते आता अवकाश आणि सायबर स्पेसपर्यंत विस्तारले आहे.उपग्रह यंत्रणा, अँटी-सॅटेलाइट 3 शस्त्रे आणि स्पेस कमांड सेंटर्स ही नव्या सामर्थ्याची साधने आहेत. त्यामुळे आपल्याला केवळ संरक्षणात्मक तयारी पुरेशी ठरणार नाही, तर आक्रमक रणनीतीचीही गरज आहे. सध्या पारंपरिक युद्धपद्धतीची जागा तंत्रज्ञानावर आधारित ३ युद्धशैलीने घेतली आहे.
भारताला कोणावरही कब्जा करायचा नाहीराजनाथ सिंह म्हणाले की, जे राष्ट्र तंत्रज्ञान, रणनीती आणि परिस्थितीनुसार बदल स्वीकारण्याची क्षमता या तीन गोष्टींत पारंगत होईल तेच खऱ्या अर्थाने जागतिक शक्ती बनू शकेल. हा इतिहासाकडून शिकण्याचा आणि नवीन इतिहास घडवण्याचा क्षण आहे. भारताला कोणाच्याही प्रदेशावर कब्जा करायचा नाही; पण वेळप्रसंगी आम्ही भूभागाच्या रक्षणासाठी लक्ष्मणरेषा ओलांडून कारवाई करायलाही तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.