शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

राफेल आल्यानं एक कमी दूर, तर दुसरी तयार; हवाई दलासमोर मोठं संकट

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 29, 2020 11:27 AM

हवाई दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'जुन्या पिढीतील सिंगल इंजिन असलेल्या चिता आणि चेतक हेलिकॉप्टर्सचे वय पूर्ण होत आहे.

ठळक मुद्दे 25-30 वर्षांत हवाई दलाकडे मंजूर 42 स्क्वाड्रनच्या जागी केवळ 30 फायटर स्क्वाड्रन आहेत.चिता आणि चेतक हेलिकॉप्टर्सचे वय पूर्ण होत आहे.16 लढाऊ विमाने आणि पायलट ट्रेनिंगची दोन विमाने मिळून भारतीय हवाई दलाचा एक स्क्वॉड्रन तयार होतो.

नवी दिल्ली - गेला काही दशकांत देशाच्या सुरक्षिततेकडे कशा प्रकारे दुर्लक्ष केले गेले, हे वारंवार समोर येत आहे. 25-30 वर्षांत हवाई दलाकडे मंजूर 42 स्क्वाड्रनच्या जागी केवळ 30 फायटर स्क्वाड्रन आहेत. म्हणजेच हवाई दलाला लढाऊ विमानांच्या कमतरतेचा मोठा सामना करावा लागत आहे. या 30 स्क्वॉड्रनमध्येही प्रामुख्याने रशियन मिग-21 ही विमाने आहेत. जी जुनी झाली आहेत. फ्रान्सबरोबर झालेल्या 36 राफेल विमानांच्या व्यवहारानंतर पहिल्या टप्प्यात पाच विमाने आली. यामुळे हवाई दलाची शक्ती निश्चितच वाढली आहे. मात्र, आता भविष्यात लवकरच हलक्या हेलिकॉप्टरची आवश्यकता भासणार आहे.

SBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट

हवाई दलाने सरकारला दिली सूचना - सरकारला माहिती देताना हवाई दलाने म्हटले आहे, चीता आणि चेतक हेलिकॉप्टर्सची 'टोटल टेक्निकल लाईफ' 2023पासून संपायला सुवात होईल. यामुळे सरकारने 'मेक इन इंडिया' अभियानाच्या धरतीवर, असे लाईट यूटिलिटी हेलिकॉप्टर्स तयार कराण्याच्या दृष्टीने वेगाने पावले उचलावेत. याशिवाय, हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या संरक्षण उत्पादन कंपनीमध्ये तयार होणाऱ्या हेलिकॉप्टर्सचा पुरवठा निर्धारित वेळत होण्याबरोबरच, एचएएलमध्ये मुबलक प्रमाणात हेलिकॉप्टर तयार करणे सुनिश्चित करण्यात यावेत, असेही हवाई दलाने म्हटले आहे.

हवाई दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'जुन्या पिढीतील सिंगल इंजिन असलेल्या चिता आणि चेतक हेलिकॉप्टर्सचे वय पूर्ण होत आहे. अशात युद्धाच्या दृष्टीने हेलिकॉप्टर्सच्या आभावाची स्थिती निर्माण होत आहे. कारण त्यांतपैकी अधिकांश हेलिकॉप्टर्स 40 वर्ष जुने आहेत.'

15 वर्षांपासून होतेय मागणी -हवाई दलाकडून गेल्या तब्बल 15 वर्षांपासून नव्या आणि वजनाने हलक्या हेलिकॉप्टरची मागणी होत आहे. यावरूनच संरक्षण दालाच्या बबतीत सरकार किती गांभीर्याने वागत आहे, याचा अंदाज येऊ शकतो. आज लडाख सीमेवर भारत आणि चीन समोरासमोर उभे ठाकले आहेत. अशात, अशा हेलिकॉप्टर्सची अत्यंत आवश्यकता आहे. 

आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा संपली, नोकरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

सध्या भूदल, हवाईदल आणि नौदलाकडे 187 चेतक तर 205 चिता हेलिकॉप्टर्स आहेत. यांच्या वापर सियाचीन सारख्या उंचावरील ठिकानीही केला जाऊ शकतो. मात्र, आता हे हेलिकॉप्टर्स एवढे जुने झाले आहेत, की ते आता क्रॅशदेखील होऊ लागले आहेत. सध्या देशाला 483 युटिलिटी चॉपर्सची आवश्यकता आहे. 

12 स्क्वॉड्रनमध्ये 192 फायटर जेट्सची कमतरता - 16 लढाऊ विमाने आणि पायलट ट्रेनिंगची दोन विमाने मिळून भारतीय हवाई दलाचा एक स्क्वॉड्रन तयार होतो. मात्र सध्या हवाईदलाकडे 42 एवजी केवळ 30 स्क्वॉड्रन आहेत. म्हणजे 192 फायटर जेट्स आणि 24 ट्रेनर एअरक्राफ्टची कमतरता आहे. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलCentral Governmentकेंद्र सरकारIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकIndiaभारत