शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनाच्या बाणात ‘आण्विक शक्ती’ होती; बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 03:43 IST

सोशल मीडियातून टीका आणि खिल्ली

कोलकाता : रामायणाच्या काळातही भारतात हवेत उडणारी उपकरणे होती आणि महाभारतातील अर्जुनाच्या बाणामध्ये तर आण्विक शक्ती होती, अशी विधाने करणारे पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांच्यावर सोशल मीडियातून टीका सुरू झाली आहे.कोलकात्यातील बिर्ला इंडस्ट्रिअल अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजिकल म्युझियमचे उद्घाटन राज्यपाल धनकड यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांसमोर बोलताना राज्यपाल म्हणाले की, भारताला अनेक शतकांपासून विज्ञानाचे ज्ञान होते. विमानांचा शोध नंतर १९१0 च्या सुमारास लागला आहे; पण वेदांचा तुम्ही अभ्यास केला, तर रामायणाच्या काळातही आपल्याकडे हवेत उडणारी उपकरणे (विमाने) होती, असे तुमच्या लक्षात येईल.

महाभारताचा उल्लेख करून राज्यपाल धनकड म्हणाले की, त्या काळात टीव्हीसारखी माध्यमे नव्हती. तरीही युद्धभूमीवर नसलेल्या संजयने संपूर्ण युद्धाची साद्यंत माहिती धृतराष्ट्राला दिली. कारण संजयकडे दिव्यदृष्टी होती. अर्जुनाच्या बाणामध्ये तर आण्विक शक्ती होती, असा दावाही राज्यपालांनी केला. आपण त्या काळात अतिशय शक्तिशाली होतो. त्यामुळे भारताकडे (या ताकदीकडे) दुर्लक्ष करणे जगाला अजिबात परवडणार नाही.

अशी विधाने करणारे जगदीप धनकड हे पहिलेच नाहीत. भाजपच्या अनेक नेत्यांनी यापूर्वीही अशी विधाने केली आहेत. गायीच्या दुधात सोने असते, असे वक्तव्य पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी मध्यंतरी केले होते. त्याआधी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी महाभारताच्या काळात इंटरनेटची सोय होती आणि त्यामुळे युद्धभूमीवर काय चालले आहे, याची माहिती संजयने धृतराष्ट्राला दिली, असे विधान केले होते.

शिक्षण क्षेत्रातील मंडळींची टीकाराज्यपाल हे संबंधित राज्यांतील विद्यापीठांचे कुलगुरू असतात. त्यामुळे उच्चशिक्षण क्षेत्रातील प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीने कसलेही पुरावे न देता, अशी विधाने करणे धक्कादायक आहे, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. न्यूक्लीअर फिजिक्सचे प्राध्यापक बिकाश सिन्हा यांनी राज्यपालांची विधाने तथ्यहीन, बेजबाबदार आणि निरर्थक असल्याची टीका केली आहे. प्रा. प्रसंता राय यांनीही राज्यपालांवर टीका केली असून, ते भाजपचा अजेंडा राबवू पाहत आहेत, असे म्हटले आहे. याशिवाय सोशल मीडियातूनही जगदीप धनकड यांच्यावर टीका होत असून, काही जणांनी त्यांची खिल्लीही उडवली आहे.