शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

करवा चौथसाठी पती घरी उशिरा आल्याने वाद, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल, पतीनेही संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 15:46 IST

Rajasthan News: करवा चौथच्या सणासाठी पती घरात उशिरा आल्याने पती-पत्नीमध्ये कडाक्याचं  भांडण होऊन संतापलेल्या पत्नीनं टोकाचं पाऊल उचलत ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवल्याची तर पत्नीचा मृतदेह पाहून धक्का बसलेल्या पतीनंही मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जयपूर येथे घडली.

करवा चौथच्या सणासाठी पती घरात उशिरा आल्याने पती-पत्नीमध्ये कडाक्याचं  भांडण होऊन संतापलेल्या पत्नीनं टोकाचं पाऊल उचलत ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवल्याची तर पत्नीचा मृतदेह पाहून धक्का बसलेल्या पतीनंही मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जयपूर येथे घडली. दरम्यान, जीवन संपवण्यापूर्वी सदर तरुणाने आपल्या भावाला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला होता, अशी माहिती समोर येत आहे.

ही घटना राजस्थानमधील हरमाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांगल सिरस गावात घडली आहे. येथील घनश्याम बुनकर हे घरी उशिरा पोहोचल्याने त्यांची पत्नी मोनिका ही नाराज झाली. त्यानंतर या दोघांमध्येही कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर मोनिका ही रागाने घराबाहेर पडली. तिच्यापाठोपाठ घनश्यामही तिची समजूत काढण्यासाठी गेला. मात्र मोनिका हिने रेल्वे रुळांवर जात भरधाव येणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारली आणि जीवन संपवलं.

तुकडे तुकडे झालेला मोनिका हिचा मृतदेह पाहून घनश्यामला मोठा धक्का बसला. त्याने घरी येत काही तासांनंतर मोहिका हिच्या साडीपासून गळफास बनवला आणि जीवन संपवलं. पती आणि पत्नीने उचललेल्या टोकाच्या पावलाची माहिती मिळताच पोलिसांनी घनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि रुग्णालयातील शवागारामध्ये पाठवले. दरम्यान, जीवन संपवण्यापूर्वी मृत घनश्याम याने भावाला एक मेसेज केला होता. त्यात तो म्हणाला होता की, ‘’भावा, मी हरलो! सॉरी, गणपतजी आणि घनश्याम कंडेल यांच्याशी बोलून घे. ते तुम्हाला मदत करतील. माझ्या आयडीवर आता तुम्हालाच काम करायचं आहे. माझ्या पत्नीनं आज ट्रेनसमोर येऊन जीवन संपवलं’’. दरम्यान, घनश्याम याचा हा मेसेज मोठ्या भावापर्यंत पोहोचेपर्यंत त्याने आपलं जीवन संपवलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घनश्याम नेटवर्क मार्केटिंग कंपनीमघ्ये काम करत होता. तसेच करवा चौथच्या दिवशी उशिरा घरी पोहोचला होता. त्यावरून दोघांमध्ये भांडण झालं आणि त्यातून दोघांनीही जीवन संपवलं.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानFamilyपरिवारrelationshipरिलेशनशिप