अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 16:51 IST2025-08-20T16:29:42+5:302025-08-20T16:51:26+5:30

मध्य प्रदेशातील इंदूर-बिलासपूर ट्रेनच्या B3 कोचमधून बेपत्ता झालेली अर्चना तिवारी अखेर १३ दिवसांनी सापडली आहे. मंगळवारी नेपाळ सीमेवरून अर्चना सापडली.

Archana Tiwari turned out to be clever! Love in the train, tried to escape to Nepal; Family members complained about kidnapping but things turned out differently | अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच

अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच

मध्य प्रदेशातील इंदूर-बिलासपूर ट्रेनच्या B3 कोचमधून बेपत्ता झालेली अर्चना तिवारी अखेर १३ दिवसांनी सापडली. मंगळवारी अर्चना नेपाळ सीमेवर सापडली. बुधवारी पोलिसांनी तिला भोपाळला आणले.  तिचा चौकशी केल्यानंतर तिने सर्व घटनाक्रम सांगितला. 

मध्य प्रदेशातील कटनी येथील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय वकील अर्चना तिवारीचा पोलिसांना शोध घ्यावा लागला, पण ती तिच्या कथित प्रियकरासह हैदराबादहून दिल्ली आणि नेपाळमध्ये फिरत होती. अर्चना ७ ऑगस्ट रोजी नर्मदा एक्सप्रेसने इंदूरहून कटनीला निघाली आणि वाटेतच बेपत्ता झाली.

‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब

या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चनाच्या कुटुंबाने तिचे लग्न पटवारीशी ठरवले होते. पण तिला तो मुलगा आवडला नव्हता. वकील होण्यासोबतच न्यायाधीश होण्याची तयारी करणाऱ्या अर्चनाला तिचा अभ्यास सुरू ठेवायचा होता. कुटुंबाशी झालेल्या वादानंतर तिने शरण नावाच्या एका मित्र आणि त्याचा साथीदार तेजिंदरसोबत एक प्लान केला. तिघांनी ट्रेनमधून बेपत्ता होण्याचा कट रचला.  जानेवारी २०२५ मध्ये रेल्वे प्रवासादरम्यान ती शरनला भेटली होती. दोघे भेटत होते आणि बोलत होते.  आधी चौकशीत अर्चनाने शरणसोबत प्रेमसंबंध असल्याचे नाकारले.

अर्चनाने मित्रांना सगळेच सांगितले होते

अर्चनाने शरन आणि तेजिंदरला घरच्यांबाबत सांगितले होते. कुटुंबियांनी ठरवलेल्या मुलासोबत लग्न करायचे नाही असे तिने सांगितले. तिला कुटुंबियांपासून दूर रहायचे होते. यासाठी तिघांनी एकत्र बसून बेपत्ता होण्याचा हा प्लान बनवला. वकील असल्याने अर्चनाला माहित होते की बेपत्ता व्यक्तींचे अनेक खटले जीआरपीमध्ये येतात आणि तिला वाटले की बेपत्ता व्यक्तींची तक्रार दाखल केली जाईल आणि कदाचित तिचा इतका शोध घेतला जाणार नाही.

अर्चना ट्रेनमधून अशी गायब झाली

तेजिंदर हा शरनचा मित्र आहे आणि तो टॅक्सी चालवतो. तेजिंदर इटारसी रेल्वे स्टेशनजवळ राहत होता. त्याने सांगितले होते की तो अर्चनाला स्टेशनच्या त्या भागातून बाहेर काढेल जिथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. रक्षाबंधनासाठी ट्रेनमधून निघालेली अर्चना प्लाननुसार गायब झाली. शुजलपूरचा रहिवासी शरन अर्चनासाठी कपडे घेऊन नर्मदापुरमला आला. तेजिंदर नर्मदापुरम येथे ट्रेनमध्ये चढला. त्याने अर्चनाला कपडे दिले. दरम्यान, शरन रस्त्याने इटारसीला आला. येथे अर्चनाने तिचा कोच बदलला आणि नंतर तेजिंदर अर्चनाला इटारसीमध्ये घेऊन जाण्यात यशस्वी झाला. येथे अर्चनाने तिचा मोबाईल फोन आणि घड्याळ तेजिंदरला दिले आणि ते मिडघाट परिसरात फेकण्यास सांगितले.

Web Title: Archana Tiwari turned out to be clever! Love in the train, tried to escape to Nepal; Family members complained about kidnapping but things turned out differently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.