मल्ल्यांनी केला होता गोव्यात कॅसिनोसाठी अर्ज

By Admin | Updated: March 17, 2016 00:53 IST2016-03-17T00:53:49+5:302016-03-17T00:53:49+5:30

बँकांचे हजारो कोटींचे कर्ज थकवून पसार झाल्याचा आरोप असलेले विजय मल्ल्या गोव्यात कॅसिनो सुरू करणार होते, अशी माहिती पुढे आली आहे. त्यांच्या युबी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट

The application for the casino in Goa was done by Mallya | मल्ल्यांनी केला होता गोव्यात कॅसिनोसाठी अर्ज

मल्ल्यांनी केला होता गोव्यात कॅसिनोसाठी अर्ज

पणजी : बँकांचे हजारो कोटींचे कर्ज थकवून पसार झाल्याचा आरोप असलेले विजय मल्ल्या गोव्यात कॅसिनो सुरू करणार होते, अशी माहिती पुढे आली आहे. त्यांच्या युबी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट कंपनीने परवान्यांसाठी अर्जही केला होता.
आ. दिगंबर कामत यांच्या प्रश्नावर विधानसभेत बुधवारी लेखी स्वरुपात ही माहिती देण्यात आली. २0१३ नंतर किती कंपन्यांनी कॅसिनोंसाठी परवाने मागितले, अशी विचारणा कामत यांनी केली होती.
डेल्टा कॉर्प, एमकेएम ग्रँड गेमिंग अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट, गोवन रिक्रीएशन क्लब, इडन इस्टेट्स व गोवा गोल्फ क्लब या पाच कंपन्यांनीही अर्ज केले आहेत. अर्जावर काय निर्णय झाला, हे मात्र विधानसभेत स्पष्ट झालेले नाही. मल्ल्या यांचा कांदोळी समुद्र किनारी आलिशान बंगलाही आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The application for the casino in Goa was done by Mallya