पाकिस्तानात ‘या’ भारतीय चॅनलला सर्वाधिक डिमांड; आकाशवाणीही लोकप्रिय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 09:33 AM2021-07-27T09:33:40+5:302021-07-27T09:34:44+5:30

भारताचे DD चॅनल आणि आकाशवाणी यांना पाकिस्तानमध्ये डिमांड असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.

anurag thakur reply in parliament on prasar bharati youtube channel dd air views | पाकिस्तानात ‘या’ भारतीय चॅनलला सर्वाधिक डिमांड; आकाशवाणीही लोकप्रिय!

पाकिस्तानात ‘या’ भारतीय चॅनलला सर्वाधिक डिमांड; आकाशवाणीही लोकप्रिय!

Next

नवी दिल्ली: तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भारतातील अनेक चॅनल, टीव्ही शोज जागतिक स्तरावरील अनेक देशांमध्ये पाहिले जातात. इंटरनेटमुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून, मातृभाषेतील किंवा आवडते चॅनल पाहणे अधिक सुलभ झाल्याचे पाहायला मिळते. भारतातील सरकारी चॅनल दूरदर्शन आणि आकाशवाणीचे कार्यक्रम परदेशातही लोकप्रिय असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. भारताचे DD चॅनल आणि आकाशवाणी यांना पाकिस्तानमध्ये डिमांड असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. (anurag thakur reply in parliament on prasar bharati youtube channel dd air views)

केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लिखित उत्तरात सदर माहिती दिली आहे. भारताची वाहिनी असलेले दूरदर्शन आणि आकाशवाणी यांना पाकिस्तानात सर्वाधिक पाहिले व ऐकले जाते, असे अनुराग ठाकूर यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे. तसेच प्रसार भारतीच्या युट्यूब चॅनलच्या दर्शकांमध्येही वाढ झाल्याचे ते म्हणाले. 

आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

प्रसार भारतीच्या युट्युब चॅनलचा पाकिस्तानात बोलबाला

सन २०२१ प्रसार भारतीचे चॅनल पाकिस्तानातील ६९ लाख ६८ हजार ४०८ दर्शकांनी पाहिले. अन्य देशांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. तर दुसरीकडे यूएसमध्ये प्रसार भारतीचे युट्युब चॅनल पाहणाऱ्यांची संख्या ५६ लाख ४७ हजार ५६५ असून, बांगलादेशमध्ये ५१ लाख ८२ हजार १० प्रेक्षक असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. तसेच नेपाळमध्ये ३१ लाख ६८ हजार ८१० आणि यूएईमध्ये २७ लाख २१ हजार ९८८ प्रेक्षकांनी प्रसार भारतीचे युट्यूब चॅनल पाहिल्याचे या उत्तरात म्हटले आहे. 

झारखंड सरकार पाडण्यामागे चंद्रशेखर बावनकुळे? राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

सन २०२० मध्ये किती प्रेक्षकांनी पाहिले चॅनल?

सन २०२० मध्ये प्रसार भारतीच्या युट्यूब चॅनल पाहणाऱ्यांमध्ये पाकिस्तानमधील प्रेक्षकांची संख्या सर्वाधिक होती. पाकिस्तानात १ कोटी ३३ लाख ५०४, यूएसमध्ये १ कोटी २८ लाख ६३ हजार ६७४, यूएईमध्ये ८२ लाख ७२ हजार ५०६, बांगलादेशमध्ये ८१ लाख ३६ हजार ६८४ आणि सौदी अरेबियामध्ये ६५ लाख २९ हजार ६८१ व्ह्यूज प्रसार भारतीच्या युट्यूब चॅनलला मिळाल्याची माहिती देण्यात आली. 

याला म्हणतात रिटर्न! TATA ग्रुपच्या ‘या’ कंपनीची कमाल; गुंतवणूकदारांचे केले १ लाखाचे ८७ लाख

दरम्यान, प्रसार भारतीचे १७० पेक्षा जास्त युट्यूब चॅनल आहेत. प्रसार भारतीचे डिजिटल चॅनल परदेशातही चांगलेच लोकप्रिय आहेत. यामध्ये आकाशवाणीचाही समावेश असून, कंटेट अपलोड करण्यासाठी डेडिकेटेड डिजिटल प्लॅटफॉर्म विंग तयार करण्यात आल्याचे समजते.  
 

Web Title: anurag thakur reply in parliament on prasar bharati youtube channel dd air views

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.