पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 19:06 IST2024-10-17T18:54:58+5:302024-10-17T19:06:11+5:30
रुळावरुन रेल्वेचे आठ डबे खाली उटरले आहेत. हा अपघात दुपारी ३. ५५ वाजता झाला.

पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
आसामध्ये रेल्वेचा अपघात झाला आहे. आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील दिबालाँग स्टेशनवर आगरतळा-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही. दुपारी ३.५५ वाजता झालेल्या या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अपघातग्रस्त मदत वैद्यकीय ट्रेन अधिकाऱ्यांसह बचावासाठी दाखल झाले आहेत. लुमडिंग-बदरपूर सिंगल लाईन हिल सेक्शनवरील गाड्यांचे संचालन स्थगित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, ही घटना लुमडिंग विभागांतर्गत लुमडिंग-बर्दरपूर हिल विभागात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. लुमडिंग-बदरपूर सिंगल लाईन सेक्शनवरील गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. बचाव आणि पुनर्संचयित कार्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लुमडिंग येथून अपघात निवारण ट्रेन आणि अपघात निवारण वैद्यकीय गाडी घटनास्थळी रवाना झाली आहे.