देहरादून : हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या केदारनाथ आपत्तीच्या प्रथम स्मृतिदिनी आणखी १२ मृतदेह सापडले आहेत. सांगाड्याच्या रूपात सापडलेल्या या १२ मृतदेहांवर केदार खोऱ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, केदारनाथ परिसरात आणखी मृतदेह शोधण्यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्सची स्थापना केली आहे.शुक्रवारी रात्री केदारनाथच्या मार्गावर असलेल्या जंगलछट्टी भागात १२ मृतदेह सापडले. या मृतदेहांचा केवळ सांगाडा तेवढा शिल्लक होता. डीएनएचे नमुने घेतल्यानंतर आणि अन्य औपचारिकता पूर्ण केल्यानंतर या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी राघव लांगार यांनी ही माहिती दिली.याआधी जंगलछट्टी येथे पाच मृतदेह सापडले होते. केदारनाथ परिसरात मृतदेह सापडण्याचा क्रम अद्याप सुरूच आहे. त्यामुळे मृतदेहांचा शोध घेण्यासाठी उत्तराखंड सरकारने विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे. (वृत्तसंस्था)
केदारनाथमध्ये आणखी १२ मृतदेह सापडले
By admin | Updated: June 15, 2014 03:06 IST
हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या केदारनाथ आपत्तीच्या प्रथम स्मृतिदिनी आणखी १२ मृतदेह सापडले आहेत. सांगाड्याच्या रूपात सापडलेल्या या १२ मृतदेहांवर केदार खोऱ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले
केदारनाथमध्ये आणखी १२ मृतदेह सापडले
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}