केंद्र सरकारकडून लवकरच आर्थिक सवलतींची घोषणा?, अर्थव्यवस्था पुन्हा घसरू नये यासाठी उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 05:42 IST2021-04-16T05:41:40+5:302021-04-16T05:42:48+5:30
central government : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. लसीकरण मोहिमेने वेग घेतला असला तरी लसींचा तुटवडा भासू लागला आहे.

केंद्र सरकारकडून लवकरच आर्थिक सवलतींची घोषणा?, अर्थव्यवस्था पुन्हा घसरू नये यासाठी उपाय
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशात सध्या सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. टाळेबंदीच्या भीतीने अनेक मजूर आपापल्या गावी निघाले आहेत. अशा परिस्थितीत रुळावर येत असलेली अर्थव्यवस्था पुन्हा घसरू नये, यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच आर्थिक सवलतींची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. लसीकरण मोहिमेने वेग घेतला असला तरी लसींचा तुटवडा भासू लागला आहे. परिणामी ‘स्पुटनिक व्ही’ या रशियन बनावटीच्या लसीला अलीकडेच मान्यता देण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था सावरून धरण्यासाठी (पान ५ वर)
संभाव्य मदत
- सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या कोणत्याही अडचणींना तत्पर साहाय्य करण्यात येईल
- उद्योगांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याला प्राधान्य
दिले जाईल
- सर्व वयोगटांतील कामगारांचे तातडीने लसीकरण केले जाईल
- गरीब तसेच मजुरांसाठी अर्थसाह्य पुरवले जाईल
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीवर नक्की परिणाम होईल; परंतु लसीकरण मोहिमेचा वेग किती राहतो यावरही त्याचे यशापयश अवलंबून राहील.
- डी. के. श्रीवास्तव, मुख्य धोरण सल्लागार, अर्न्स्ट अँड यंग, इंडिया