शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

पंतप्रधान मोदींच्या मित्राचा काँग्रेसला 'हात'? भाजपाची बिकट वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 12:35 PM

महाआघाडीच्या हालचालींना वेग आल्यानं भाजपाची चिंता वाढणार

पाटणा: लोकसभा निवडणुकीपूर्वी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन एनडीएमधून बाहेर पडणारे राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा भाजपाला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भाजपाची साथ सोडणारे कुशवाहा लवकरच काँग्रेसचा 'हात' धरू शकतात. आज संध्याकाळपर्यंत बिहारमध्ये 'महाआघाडी'ची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहारमध्ये भाजपाची वाट बिकट होऊ शकते. आज संध्याकाळी राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी, राष्ट्रीय लोक समता पार्टीचे उपेंद्र कुशवाहा यांच्यात बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला आव्हान देण्यासाठी बिहारमधील पक्ष एकत्र येत आहेत. काँग्रेसकडून तीन राज्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानं भाजपा नेतृत्त्व चिंतेत असताना बिहारमधील राजकीय घडामोडींमुळे या अडचणींमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये महाआघाडी झाल्यास त्याचा मोठा फटका भाजपाला बसू शकतो. महाआघाडी संदर्भात राष्ट्रीय जनता दल, हिंदुस्तानी अवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टीशी चर्चा सुरू असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव यांनी अनेकदा महाआघाडीवर भाष्य केलं आहे. सोमवारी तीन राज्यांमध्ये काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या सर्व कार्यक्रमांना तेजस्वी उपस्थित होते. एकीकडे मोदींचे मित्र कुशवाहा काँग्रेसच्या गोटात जाण्याची तयारी करत असताना लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान यांनीदेखील भाजपावर दबाव वाढवला आहे. काही दिवसांपूर्वीच पासवान यांचे पुत्र चिराग यांनी राहुल यांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे भाजपाच्या चिंतेत भर पडली आहे. बिहारमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच निश्चित होऊ शकतो. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. महाआघाडीत कुशवाहा यांचा प्रवेश झाल्यास त्यांच्या राष्ट्रीय लोक समता पार्टीला 4-5 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 8-12, राष्ट्रीय जनता दलाला 18 ते 20, हिंदुस्तानी अवाम मोर्चाला 1-2 आणि सीपीएम-सीपीआयला प्रत्येकी 1 जागा मिळू शकते. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि मित्र पक्षांनी बिहारमध्ये 40 पैकी 31 जागा जिंकल्या होत्या.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाBiharबिहारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Tejashwi Yadavतेजस्वी यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल