शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

9 मार्चला होईल निवडणुकांची घोषणा, 8 मार्चपूर्वीच उद्घाटनं करून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 08:50 IST

आपल्या नव्या प्रकल्पांचे पायाभरणी समारंभ 8 मार्चपर्यंत पूर्ण करावेत आणि जे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, त्यांची उद्घाटनेही 8 मार्चच्या आधी करून टाकावीत.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार 9 मार्च रोजी निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होऊ शकते. त्यामुळेच 8 मार्चपर्यंत सर्वच विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटनाची कामे पूर्ण करा, असे आदेशच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच मंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याचे समजते. 

आपल्या नव्या प्रकल्पांचे पायाभरणी समारंभ 8 मार्चपर्यंत पूर्ण करावेत आणि जे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, त्यांची उद्घाटनेही 8 मार्चच्या आधी करून टाकावीत, असे आदेश पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) सर्व मंत्रालयांना दिले आहेत. कारण, लोकसभा निवडणुकांची घोषणा 9 मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहेत. स्वत: पंतप्रधान मोदी 8 मार्चपर्यंत देशातील विविध केंद्रीय प्रकल्पांची उद्घाटने व पायाभरणी समारंभ करण्यात गुंतलेले असतील. त्या निमित्ताने ते सरकारी व्यासपीठावरून विरोधकांवर राजकीय टीकाही करीत आहेत. आचारसंहितेनंतर मोदींना सरकारी व्यासपीठाचा अशा कारणासाठी वापर करता येणार नाही.

रस्ते वाहतूक, रेल्वे, कोळसा, ऊर्जा, दूरसंचार, माहिती-तंत्रज्ञान, पेट्रोलियम, विज्ञान व तंत्रज्ञान, पोलाद, खाण उद्योग, वस्त्रोद्योग, अन्नप्रक्रिया, आरोग्य, तसेच संरक्षण विभागाशी संबंधित प्रकल्पांवर मोदी सरकारने भर दिला होता. त्याचा फायदा निवडणुकांत मिळावा, यासाठीच हे आदेश देण्यात आले आहेत. नितीन गडकरी, पीयूष गोयल, आर. के. सिंह यांचे प्रकल्प प्रामुख्याने पायाभूत सुविधांशी संबंधित असल्याने त्यांवर भर देण्यात आला आहे.आयोगाने निवडणुकांची घोषणा केली की, आचारसंहिता लगेच लागू होईल आणि मग प्रकल्पांची उद्घाटने वा पायाभरणी समारंभ करता येणार नाहीत. नव्या योजनांचीही घोषणा करता येणार नाही. त्यामुळे नव्या योजनांची घोषणाही लगेच करून टाका, असेही मंत्रालयांना सांगण्यात आले आहे. तर शेतकरी सन्मान योजनेतील दुसऱ्या हफ्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होताच ही घोषणा होऊ शकते. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना नेते आणि कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या तयारीला लागा, असे म्हटले होते. तसेच आगामी 4 ते 5 दिवसांत निवडणुकांची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होईल, असेही पवार म्हणाले होते. त्यामुळे याच आठवड्यात निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. तर, राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. 

श्रमयोगी मानधन योजना आज होणार जाहीर?आपण ज्या उद्घाटन व पायाभरणी कार्यक्रमांना जात आहोत, तिथे संबंधित खात्याच्या मंत्र्याने उपस्थित राहण्याचे कारण नाही. त्याऐवजी तुम्हीच तुमच्या कार्यक्रमांचा धडाका सुरू करा, असे पंतप्रधानांनी कार्यालयामार्फत सर्व मंत्र्यांना कळविले आहे. पंतप्रधान दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून, तिथे ते मंगळवारी पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९lok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकBJPभाजपाministerमंत्री