शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पातील घोषणांवर काम सुरू

By admin | Updated: July 29, 2014 01:51 IST

नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणे फार मोठ्या आणि ‘अच्छे दिन

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणे फार मोठ्या आणि ‘अच्छे दिन’ दाखविणाऱ्या घोषणा करण्यात आल्या नसल्या तरी आता मात्र या सर्व अर्थसंकल्पीय प्रस्तावांवर वेगाने काम करून येत्या काही आठवड्यात त्यांची अंमलबजावणी केली जाईल हे सुनिश्चित करण्याचा सरकारचा विचार आहे. येत्या १५ आॅगस्ट या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील त्यावेळी बोलायला त्यांच्याकडे ठोस मुद्दे असायला हवे हे त्यामागचे कारण आहे.कॅबिनेट सचिव अजित सेठ यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांना अर्थसंकल्पातील प्रमुख प्रस्तावांवर मोदींच्या भाषणापूर्वी म्हणजे १० आॅगस्टपासून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. मोदी यांचे स्वातंत्र्य दिनी देण्यात येणारे हे पहिलेच महत्त्वपूर्ण आणि सरकारच्या कामगिरींची यादी दाखविणारे भाषण असेल. अर्थात देशाला उद्देशून केल्या जाणाऱ्या आपल्या पहिल्या भाषणात सरकारची यशोगाथा सांगता यावी म्हणून हा सर्व खटाटोप आहे. पंतप्रधान कार्यालय अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांच्या अमंलबजावणीवरही लक्ष ठेवून आहे. तसेच धोरणांशी संबंधित इतर बाबींवरही नजर ठेवली जात आहे. वित्तमंत्री अरु ण जेटली यांनी १० जुलैला मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. साधारणपणे दुसऱ्या वर्षीचा अर्थसंकल्प आल्यानंतर आधीच्या अर्थसंकल्पाच्या घोषणांच्या अंमलबजावणीची लगबग सुरू होते. पण यावेळी सर्व विभागांना वेगाने काम करण्यासाठी वेगाने निर्णय घेण्याचे निर्देश कॅबिनेट सचिवांमार्फत देण्यात आले आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)