संदेसरा कुटुंबीयांना फरार घोषित करा; ईडीचा विशेष न्यायालयात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 13:58 IST2018-10-26T13:01:32+5:302018-10-26T13:58:48+5:30

नवी दिल्ली : देशातील बँकांना चुना लावून परदेशात पळून जाणारा आणखी एक गुजरातचा उद्योजक नितीन संदेसरा आणि त्याच्या अन्य ...

announce nitin sandesara and three others Fugitive; ED Appeal to Special Court | संदेसरा कुटुंबीयांना फरार घोषित करा; ईडीचा विशेष न्यायालयात अर्ज

संदेसरा कुटुंबीयांना फरार घोषित करा; ईडीचा विशेष न्यायालयात अर्ज

नवी दिल्ली : देशातील बँकांना चुना लावून परदेशात पळून जाणारा आणखी एक गुजरातचा उद्योजक नितीन संदेसरा आणि त्याच्या अन्य साथीदारांना फरार घोषित करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने विशेष न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आहे. 




संदेसराने आंध्र बँकेला 5 हजार कोटी रुपयांना ठकविले आहे. यामुळे त्याचे नातेवाईक चेतन संदेसरा, दिप्ती संदेसरा आणि हितेश पटेल यांना फरारी घोषित करण्यात यावे, या चौघांनीही चौकशी टाळण्यासाठी परदेशात पलायन केल्याचा आरोप ईडीने ठेवला आहे. 

यावर दिल्लीच्या पटियाला विशेष न्यायालयाने संदेसराच्या स्टर्लिंग बायोटेककडे उत्तर मागितले आहे.

Web Title: announce nitin sandesara and three others Fugitive; ED Appeal to Special Court