(निनाद) दिल्ली, आग्रा येथे शिवरायांचे स्मारक करा

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:37+5:302015-02-18T00:13:37+5:30

राजेंद्र कुंजीर : शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

(Annad) Memorial of Shivrajaya at Delhi, Agra | (निनाद) दिल्ली, आग्रा येथे शिवरायांचे स्मारक करा

(निनाद) दिल्ली, आग्रा येथे शिवरायांचे स्मारक करा

जेंद्र कुंजीर : शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
लेण्याद्री : आग्रा तसेच देशाच्या राजधानी दिल्ली येेथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक तयार करण्यात यावे, अशी मागणी मराठा सेवा संघाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र कुंजीर यांनी केली.
जुन्नर येथे किल्ले शिवनेरीवरील शिवजयंती सोहळ्याच्या नियोजनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्‘ाचे पालकमंत्री गिरीश बापट, पंकजा मुंडे, विजय शिवतरे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिवनेरीवर शाहीर राजेंद्र कुरुंजकर यांचा शाहिरी कार्यक्रम होणार आहे. शिल्पकार दिनकरराव थोपटे यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. जुन्नर येथील शिवसृष्टी प्रकल्पाचे विस्तारीकरण करणे, शासनाच्या माध्यमातून नव्याने शिवचरित्राचे लेखन व्हावे, शिवनेरीवरील विकासकामांसाठी दक्षता समितीची नेमणूक करावी अशा विविध मागण्या या वेळी कुंजीर यांनी केल्या. सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनील ढोबळे, माजी अध्यक्ष राजेंद्र बु˜े-पाटील, शहर युवक अध्यक्ष रोहन महाबरे आदी उपस्थित होते.
०००००

Web Title: (Annad) Memorial of Shivrajaya at Delhi, Agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.