"मी कोणत्याही थराला जाऊ शकते, तू विचार पण करू शकत नाहीस"; अंजूने नवऱ्याला दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 13:06 IST2023-07-30T12:56:01+5:302023-07-30T13:06:04+5:30
अंजूने अरविंदला धमकी दिली की ती तिच्या मुलांसाठी भारतात येईल. दोघांमधील फोनवरची ही चर्चा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

"मी कोणत्याही थराला जाऊ शकते, तू विचार पण करू शकत नाहीस"; अंजूने नवऱ्याला दिली धमकी
फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहसाठी भारतातूनपाकिस्तानात गेलेल्या अंजूचा नवा कारनामा समोर आला आहे. पाकिस्तानात जाऊन अंजू नसरुल्लाहसोबत निकाह केल्यानंतर फातिमा झाली आहे. अंजूने आता पती अरविंदला पाकिस्तानातून फोन करून धमकी दिली आहे. यावेळी तिने अरविंदला शिवीगाळ करत मी कोणत्याही थराला जाऊ शकते, तू विचार पण करू शकत नाहीस असं म्हटलं आहे. अंजूने अरविंदला धमकी दिली की ती तिच्या मुलांसाठी भारतात येईल. दोघांमधील फोनवरची ही चर्चा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजूने पती अरविंदला फोन करून खूप काही सांगितले. अंजू अरविंदला सांगते की, ती मुलांसाठी भारतात येणार आहे. यानंतर अरविंदलाही राग आला आणि त्याने अंजूला खूप वाईट म्हटलं आहे. अरविंदला धमकी दिल्यावर त्याने अंजूला सांगितले की तू माझ्यासाठी मेली आहेस. तू पाकिस्तानात नाच, राहा... काहीही कर. तू लग्न केलं आहे आणि तू खोटं बोलत आहेस. 2 मिनिटे 55 सेकंदाच्या या ऑडिओमध्ये खूप शिवीगाळ केली आहे.
अंजू अरविंदला म्हणाली तू माझ्याबद्दल काय बोलत आहेस? तू मीडियाच्या इशार्यावर नाचतोय. अरविंदने अंजूला सांगितले की, तू पाकिस्तानात नाचत आहेस. तू खोट्यावर खोटं बोलत आहेस. अंजू म्हणाली ही माझी इच्छा आहे, मला रोखणारा तू कोण आहेस? अरविंद म्हणाला तू मर. तू माझ्यासाठी मेली आहेस. त्याचवेळी अंजूने अरविंदवर गंभीर आरोप केले. ती म्हणाली मी तुझ्यासोबत राहत होते. हे माझे दुर्दैव होते.
याच दरम्यान मुलांबाबत दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मुलं माझ्याकडेच राहतील, असं अरविंद म्हणाला. या संभाषणादरम्यान अरविंद अनेकवेळा सांगत होता की मला तुझ्य़ाशी बोलायचं नाही. पण अंजू तिचा राग काढत राहिली. अंजू अलवरच्या भिवडी शहरात राहत होती. पती आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याला न सांगता ती 20 जुलै रोजी गुपचूप पाकिस्तानात गेली. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिने तिचे फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहसोबत निकाह केला आहे. तिने धर्म बदलला आणि अंजूचे नाव बदलून फातिमा केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.