शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

अनिताच्या आत्महत्येमुळे संताप; तामिळनाडूमध्ये विविध संघटनांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:51 IST

डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मोठी जिद्द आणि मेहनतीने बारावी परीक्षेत ९८ टक्के गुण मिळविणाºया दलित कुटुंबातील एस. अनिताने काल, शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे शनिवारी तामिळनाडूत सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

चेन्नई : डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मोठी जिद्द आणि मेहनतीने बारावी परीक्षेत ९८ टक्के गुण मिळविणाºया दलित कुटुंबातील एस. अनिताने काल, शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे शनिवारी तामिळनाडूत सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याच अनिताने ‘नीट’विरुद्ध याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला होता.विद्यार्थ्यांसह राजकीय व विविध संघटनाही रस्त्यावर उतरल्या आहेत. चेन्नईत विद्यार्थी आणि राजकीय पक्षांच्या वतीने नऊ ठिकाणी निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी ८० महिलांसह ४५० निदर्शकांनाअटक केली असून, दोन ठिकाणी पंतप्रधानांच्या प्रतिमेचे दहन केले.एस. अनिता १७ वर्षांची मुलगी. तिचे वडील रोजंदारीवर मजुरी करतात. डॉक्टर होऊन वडिलांच्या कष्टाचे चीज करायचे तिने ठरविले होते. बारावीत १,२०० पैकी १,१७६ गुण मिळविले. राज्याच्या सीईटीमध्ये मेडिकल आणि इंजिनिअरसाठी अनुक्रमे १९६.७५ आणि १९९.७५ गुण मिळवले. मद्रास इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीत एरोनॉटिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश देऊ करण्यात आला. पशुवैद्यकीय अभ्यासक्रमालाही तिचा नंबर लागला; परंतु डॉक्टर होण्याची तिची जिद्द होती. तथापि, मेडिकल प्रवेशासाठी राष्टÑीय पातळीवरील ‘नीट’ परीक्षेत तिला ७०० पैकी ८६ गुण मिळाले. नीट परीक्षेतून तामिळनाडूला सूट देण्याची शक्यता धूसर झाल्याने तिने अरियालूर जिल्ह्यातील कुळुमूर गावी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.अनिताच्या आत्महत्येने तिच्या गावात राज्यात उद्रेकाची लाट पसरली. दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद करण्यात आली. रस्ते अडवून केंद्र व राज्य सरकारविरोधात लोकांनी संतप्त घोषणाबाजी केली. तिरुनवेली जिल्ह्यात नामा तमिळार कच्ची या संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कोइम्बतूर, रामेश्वरम येथेही युवक संघटनांनी अनिताला न्याय देण्याची मागणी करीत नीट परीक्षा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)मान्यवरांनी व्यक्त केला शोकमागच्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला असे निर्देश दिले होते की, नीटच्या प्रावीण्य यादीनुसार एमबीबीएस आणि बीडीएससाठी प्रवेश प्रक्रिया अमलात आणावी.द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, व्हीसीकेचे तोल तिरूमवलावन, अभिनेते कमल हसन, रजनीकांत यांच्यासह इतर राजकीय पक्ष नेते आणि विविधि मान्यवरांनी अनिताच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकारने तिच्या कुटुंबियास ७ लाख रुपयांची मदत आणि अनुकंपेवर सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे.