अनिल रताळ गजाआड बसस्थानकावरील तोडफोड प्रकरण

By Admin | Updated: September 14, 2015 00:39 IST2015-09-14T00:39:05+5:302015-09-14T00:39:05+5:30

अकोला - मध्यवर्ती बसस्थानकावरील उपाहारगृहामध्ये तोडफोड केल्याप्रकरणी अनिल रताळ याला स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री अटक केली. या आरोपीला रात्रीच सिव्हिल लाइन्स पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Anil Ratal Gaja Awad at the bus station | अनिल रताळ गजाआड बसस्थानकावरील तोडफोड प्रकरण

अनिल रताळ गजाआड बसस्थानकावरील तोडफोड प्रकरण

ोला - मध्यवर्ती बसस्थानकावरील उपाहारगृहामध्ये तोडफोड केल्याप्रकरणी अनिल रताळ याला स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री अटक केली. या आरोपीला रात्रीच सिव्हिल लाइन्स पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मध्यवर्ती बसस्थानकावरील अखिलेश पारिका यांच्या उपाहारगृहामध्ये फुकट खाणे तसेच पाणी बॉटल घेऊन त्याचे पैसे न दिल्यामुळे मालकाने बिलाची विचारणा केल्याने काही युवकांनी बुधवारी रात्री तोडफोड केली होती. याआधीही या उपाहारगृहामध्ये अशा प्रकारची तोडफोड करण्यात आली होती. मात्र, या युवकांच्या भीतीपोटी उपाहारगृह संचालकांनी याकडे दुर्लक्ष केले होते. सहा महिन्यापूर्वी या प्रकरणाची एक तक्रार सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या तक्रारीवर पोलिसांनी थातुरमातूर कारवाई करून आरोपींकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर बुधवारी रात्री पुन्हा अशाच प्रकारे तोडफोड केल्यामुळे पारिका यांनी या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी अनिल रताळ, आशिष वानखडे यांच्यासह त्यांच्या तीन साथीदारांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३८७, ४२७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपी अनिल रताळ याला स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री अटक केली असून, त्याला सिव्हिल लाइन्स पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Anil Ratal Gaja Awad at the bus station