angry man hurls his two kids in 300 ft deep gorge in tamil nadu | धक्कादायक! पत्नीसोबत भांडण झालं म्हणून मुलांना फेकलं दरीत 
धक्कादायक! पत्नीसोबत भांडण झालं म्हणून मुलांना फेकलं दरीत 

ठळक मुद्दे पत्नीसोबत भांडण झालं म्हणून संतापलेल्या पतीने आपल्या दोन्ही मुलांना 300 फूट खोल दरीत फेकले आहे. तामिळनाडूतील कोल्ली हिल्स येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून अधिक तपास करत आहेत. 

नमक्कल - पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. पत्नीसोबत भांडण झालं म्हणून पतीने आपल्या दोन्ही मुलांना 300 फूट खोल दरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूतील कोल्ली हिल्स येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीसोबत भांडण झालं म्हणून संतापलेल्या पतीने आपल्या दोन्ही मुलांना 300 फूट खोल दरीत फेकले आहे. काही महिन्यांपूर्वी या पती-पत्नीत वाद झाला होता. वादानंतर नाराज झालेली पत्नी घर सोडून आपल्या वडिलांकडे राहायला गेली होती. पत्नी घरी परत येत नसल्याने नाराज झालेल्या पतीने रागाच्या भरात आपल्या दोन्ही मुलांना दरीत फेकून दिलं आहे. या प्रकरणी कोल्ली हिल्समधील वंजावधी नाडू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. मात्र आरोपीची पत्नी बुधवारी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर याबाबत माहिती मिळाली. सिरंजीवी (28) आणि त्याची पत्‍नी बक्कियम (24) हे दोघं तामिळनाडूत राहतात. गिरिदास (8) आणि कविदर्शिनी (5) ही दोन मुलं काही दिवसांपासून गायब असल्याची तक्रार पत्नीने पोलिसांत दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता पतीने मुलांना खोल दरीत फेकल्याचं कबूल केलं. पत्नी भांडत असल्याने रागाच्या भरात आपल्या दोन्ही मुलांना खोल दरीत फेकल्याची माहिती सिरंजीवी याने पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. 

पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याच्या घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. अशीच एक विचित्र घटना ही उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्हात घडली आहे. पत्नीला खाण्यासाठी अंडं न देणं एका पतीला चांगलंच महागात पडलं आहे. पती घरामध्ये खाण्यासाठी अंडी देत नाही म्हणून पत्नी घर सोडून प्रियकरासोबत पळाल्याची घटना समोर आली होती. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ही घटना घडली होती. काही दिवसांपूर्वी पत्नीसाठी गिफ्ट न आणणं एका पतीला चांगलंच महागात पडलं होतं. करवा चौथला पत्नीने सोन्याची नथ आणायला सांगितली होती. मात्र फक्त साडी घेऊन पती पोहचल्याने तिचा पारा चांगलाच चढला. गिफ्ट न आणल्याने रागाच्या भरात पतीला पळवून पळवून मारल्याची घटना समोर आली होती. 

 

Web Title: angry man hurls his two kids in 300 ft deep gorge in tamil nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.