धक्कादायक! अंगणवाडी सेविकेनं रडणाऱ्या चिमुरड्याच्या तोंडात कोंबला मसाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 15:11 IST2018-07-12T15:10:05+5:302018-07-12T15:11:04+5:30
मूल शांत होत नसल्यानं अंगणवाडी सेविकेनं तोंडात मसाला भरला

धक्कादायक! अंगणवाडी सेविकेनं रडणाऱ्या चिमुरड्याच्या तोंडात कोंबला मसाला
हैदराबाद: मूल रडू लागल्यानं अंगणावाडी सेविकेनं त्याच्या तोंडात मसाला कोंबल्याची धक्कादायक घटना आंध्रप्रदेशात घडली आहे. कृष्णा जिल्ह्यातील भुशनगुल्ला गावात हा भयंकर प्रकार घडला.
एका चिमुरड्याची आई त्याला अंगणवाडीत सोडून गेली. आई घरी गेल्यानंतर मूल रडू लागलं. त्यावेळी अंगणावाडीत काम करणाऱ्या कुमारी नावाच्या सेविकेनं मुलाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र मूल शांत होत नव्हतं. त्यामुळे कुमारीनं रडणाऱ्या मुलाच्या तोंडात चक्क मसाला कोंबला. याप्रकरणी मुलाच्या पालकांनी आणि स्थानिकांनी अंगणावाडी सेविकेची वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.