शिक्षकी पेशाला काळिमा ! विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून सलग 2 वर्ष बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 16:01 IST2018-08-22T15:54:35+5:302018-08-22T16:01:20+5:30

शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

andhra pradesh teacher beaten up stripped and paraded for allegedly raping student | शिक्षकी पेशाला काळिमा ! विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून सलग 2 वर्ष बलात्कार 

शिक्षकी पेशाला काळिमा ! विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून सलग 2 वर्ष बलात्कार 

नवी दिल्ली - शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील एलुरु येथे एका शिक्षकानं आपल्याच विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर संतप्त झालेल्या पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपी शिक्षकाला बेदम मारहाण केली. यानंतर त्याची विवस्त्र धिंड काढून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.  

38 वर्षीय शिक्षकाचं नाव रामबाबू असून त्याच्यावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर सलग दोन वर्ष बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रामबाबू इंग्रजी विषयाचा शिक्षक आहे. त्याच्यावर इयत्ता दहावीतील विद्यार्थिनीचे गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. 

परीक्षेत चांगले गुण देण्याच्या आमिषातून आरोपी शिक्षकानं पीडितेवर वारंवार बलात्कार केला. जेव्हा पीडित मुलगी गरोदर राहिली तेव्हा आरोपी रामबाबूनं तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी आरोपी शिक्षकाला पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याची गावातून धिंड काढत पोलिसांच्या ताब्यात दिलं. 
 

Web Title: andhra pradesh teacher beaten up stripped and paraded for allegedly raping student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.