Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 13:11 IST2025-11-01T13:10:56+5:302025-11-01T13:11:24+5:30
Stampede At Venkateswara Swamy Temple: काशी बुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान नऊ भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात एक दुर्दैवी अपघात घडला असून, काशी बुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान नऊ भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. यापैकी काही जखमींची प्रकृती चिंताजनक असून, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या या परिसरात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी एकादशीनिमित्त वेंकटेश्वर स्वामी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. मंदिर संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक गर्दी वाढली, ज्यामुळे भविकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिति निर्माण झाली. घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू केले.
VIDEO | Andhra Pradesh: Stampede reported at Venkateswara Temple in Kashibugga in Srikakulam district; several devotees injured, rushed to hospital. More details are awaited.
— Press Trust of India (@PTI_News) November 1, 2025
(Source: Third Party)#AndhraPradeshpic.twitter.com/dOJxEI4JHC
नेमकं काय झालं?
कार्तिक महिन्याच्या एकादशीनिमित्त मंदिरात प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीमुळे मंदिरातील रेलिंग कोसळली, ज्यामुळे गोंधळ उडाला आणि लोक एकमेकांवर पडले. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हा अपघात झाला. समोर आलेल्या व्हिडीओ आणि फोटोंवरून असा अंदाज आहे की, मृतांमध्ये बहुतेक महिला आहेत.
घटनास्थळी बचावकार्य सुरू, मंत्रीही पोहोचले
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस कर्मचारी आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि मदत कार्य जलद करण्यासाठी अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. घटनेनंतर राज्याचे कृषी मंत्री के.अचन्नायडू देखील लगेच मंदिरात पोहोचले आणि मंदिर व्यवस्थापन अधिकाऱ्यांची भेट घेतली. मंत्री नारा लोकेश यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि सांगितले की त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी आणि स्थानिक आमदारांशी बोललो आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईचे निर्देश
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले, "श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेत जीवितहानी झाल्याचे ऐकून अत्यंत दुःख झाले आहे. मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या संवेदना व्यक्त करतो. मी अधिकाऱ्यांना जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत आणि स्थानिक अधिकारी व लोकप्रतिनिधींना घटनास्थळी भेट देऊन मदत कार्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे."