आंध्र प्रदेशात दगडाच्या खाणीत स्फोट, 11 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 00:07 IST2018-08-04T00:06:48+5:302018-08-04T00:07:10+5:30

आंध्रप्रदेशातील एका दगडाच्या खाणीत स्फोट झाला. या स्फोटात 11 कामगारांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

Andhra Pradesh: At least nine killed in stone quarry blast in Kurnool | आंध्र प्रदेशात दगडाच्या खाणीत स्फोट, 11 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशात दगडाच्या खाणीत स्फोट, 11 जणांचा मृत्यू

कुरनूल : आंध्र प्रदेशातील एका दगडाच्या खाणीत स्फोट झाला. या स्फोटात 11 कामगारांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री स्फोट झाला. यामध्ये 11 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलीस, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे. जखमींना येथील जवळच्याच सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. 


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून त्यांनी स्फोटातील जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी अधिका-यांना आदेश दिले आहेत. दरम्यान, या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही. 


Web Title: Andhra Pradesh: At least nine killed in stone quarry blast in Kurnool