VIDEO : ...आता तोपर्यंत विधानसभेत पाय ठेवणार नाही; भर पत्रकार परिषदेत ढसा-ढसा रडले चंद्राबाबू नायडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 17:45 IST2021-11-19T17:43:15+5:302021-11-19T17:45:40+5:30
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत महिला सक्षमीकरणावरील चर्चेदरम्यान 71 वर्षीय नायडू त्यांच्याविरोधात आणि त्यांच्या पत्नीविरोधात वायएसआरसीपीच्या सदस्यांनी केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यांवरून भावूक आणि व्यथित झालेले दिसले.

VIDEO : ...आता तोपर्यंत विधानसभेत पाय ठेवणार नाही; भर पत्रकार परिषदेत ढसा-ढसा रडले चंद्राबाबू नायडू
आता चालू कार्यकाळात आपण विधानसभेत पाय ठेवणार नाही, अशी भीष्म-प्रतिज्ञा तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष तथा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी मंगळवारी केली. सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आपला आणि आपल्या पत्नीचा अपमान केल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी चंद्राबाबू नायडू भावूक झाले होते. (Chandrababu naidu upset by the insult of his wife.)
चंद्राबाबू म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यानंतरच विधानसभेत परतेन -
नायडू म्हणाले, या घटनेनंतर आपण विधानसभेत सहभागी होणार नाही. मी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतरच सभागृहात परतेन. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत महिला सक्षमीकरणावरील चर्चेदरम्यान 71 वर्षीय नायडू त्यांच्याविरोधात आणि त्यांच्या पत्नीविरोधात वायएसआरसीपीच्या सदस्यांनी केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यांवरून भावूक आणि व्यथित झालेले दिसले.
नायडू ढसा-ढसा रडले -
यानंतर, मंगलागिरी येथील टीडीपीच्या राज्य मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नायडूंना अश्रू अनावर झाले आणि ते ढसा-ढसा रडले. ते म्हणाले, मी सत्तेत असो वा सत्ते बाहेर, माझी पत्नी कधीही राजकारणात आली नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिने मला प्रोत्साहन दिले. तिने कधीही राजकारणात हस्तक्षेप केला नाही. तरीही त्यांनी (YSRCP) माझ्या पत्नीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला.
Shri @ncbn garu cried like a kid #ChandrababuNaidu#Telugudeshampic.twitter.com/OTS2xREi6W
— LOGAN (@Its_Jdeep) November 19, 2021
अध्यक्षही झाले मूकदर्शक - चंद्राबाबू
चंद्राबाबू म्हणाले, सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, सत्ताधारी पक्षाचे सदस्य जेव्हा माझ्या पत्नीसंदर्भात अपशब्द बोलत होते, तेव्हा अध्यक्ष मूकदर्शक होऊन फक्त बघत राहिले. उर्वरित कार्यकाळात विधानसभेपासून दूर राहण्याच्या माझ्या निर्णयावरही मला बोलू दिले नाही. गेल्या अडीच वर्षांपासून मी अपमान सहन करत आहे. पण, आता मी माझा लढा जनतेत नेऊन त्यांचा पाठिंबा घेणार आहे. मुख्यमंत्री म्हणून जनतेचा जनादेश मिळाल्यावरच मी विधानसभेत पाय ठेवेन.